Pune Crime : 65 लाखांची खंडणी मागणाऱ्या गजानन मारणे टोळीतील चार जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील बिल्डरकडे 65 लाखाची खंडणी मागणाऱ्या गजानन मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणे याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : पुण्यातील (pune) बिल्डरकडे (builder) 65 लाखाची खंडणी मागणाऱ्या गजानन मारणे (Gajanan Marane) टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणे (rupesh Marne) याच्यासह चार जणांवर गुन्हा (Pune crime) दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. रुपेश मारणे याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश प्रसाद वाफगावकर, नितीन तुकाराम ननावरे, अनिल अंबादास लोळगे आणि रुपेश कृष्णराव मारणे अशी आरोपींची नावं आहेत. हे चारही गजानन मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. याबाबत कोथरूडमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रारी अर्ज केला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, रमेश गवळी यांनी बांधकाम व्यवसायासाठी चार जणांकडून 1 कोटी 85 लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात 2 कोटी 30 लाख रुपयेदेखील दिले होते. त्यानंतर देखील उमेश प्रसाद वाफगावकर, नितीन तुकाराम ननावरे, अनिल अंबादास लोळगे आणि रुपेश कृष्णराव मारणे यांनी गवळी यांच्याकडे 65 लाखांची मागणी केली होती. कर्वे नगर जवळ बांधकाम पूर्ण झालेले 12 फ्लॅट तयार करार करुन सिक्युरिटी म्हणून घेतले होते. फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न करुन धमकी दिल्याचं तक्रारीच म्हटलं आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या अर्जाची चौकशी केली असता आरोपींनी खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली होती. चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गजानन मारणेला न्यायालयीन कोठडी
कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याला पुणे विशेष न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. 29 ऑक्टोंबर पर्यंत गज्या मारणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र मोक्का कोर्टाने त्यांना न्यायलायीन कोठडी आली आहे. वाई येथून ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी गज्या मारणेला आणि त्याच्या इतर साथीदाराला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. 20 कोटीच्या खंडणी प्रकरणी गज्या मारणे याला अटक झाली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्महाऊस वर भेटण्यासाठी आले असताना पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
