एक्स्प्लोर
Chhatrapti Shivaji Maharaj Jayanti: शिवजयंत्ती निमित्त मुस्लिम मावळ्यांकडून कोंढव्यात राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन; पाहा फोटो
Chhatrapti Shivaji Maharaj Jayanti: पुण्यातील कोंढव्यात मुस्लिम मावळा फाउंडेशनच्यावतीने सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Chhatrapti Shivaji Maharaj Jayanti
1/6

आज पुण्यातील कोढवा येथे मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केले होते.
2/6

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये मुस्लिम समाजातील युवक ,महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
3/6

सर्व धर्मियांना समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असं मत यावेळी मावळ्यांनी व्यक्त केलं.
4/6

सालाबादप्रमाणे यावर्षीही श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करुया आणि त्यांच्या विचारांना उजाळा देऊया आणि शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाचे विचार समजापर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे मत यावेळी आयोजक मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केले आहे.
5/6

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.
6/6

शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केले होते . सर्व धर्मियांना समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असंही ते म्हणालेत.
Published at : 19 Feb 2025 03:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
