एक्स्प्लोर
Shivsrushti : शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे शिवजयंतीच्या निमित्ताने लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन, पाहा फोटो
Shivsrushti : शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन मागील वर्षी केंद्रीय मंत्री अमित शहांच्या हस्ते झाले होते. पहिल्या टप्प्यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च आला होता.

Shivsrushti
1/6

पुण्याच्या आंबेगाव भागात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
2/6

शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन मागील वर्षी केंद्रीय मंत्री अमित शहांच्या हस्ते झाले होते. पहिल्या टप्प्यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यातील काही वाटा केंद्र आणि काही वाटा राज्य सरकारने उचलला होता.
3/6

आता दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडले आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी 87 कोटी रुपये खर्च आला असून यासाठी देखील सरकारकडून काही मदत करण्यात आली आहे.
4/6

image 4
5/6

शिवसृष्टीच्या या दुसऱ्या टप्प्यात फिरते सभागृह हे मुख्य आकर्षण असणार आहे. 360 अंशांमध्ये हे सभागृह प्रेक्षकांना घेऊन फिरत राहणार असून ३६ मिनिटांचा शो या फिरत्या सभागृहात दाखवण्यात येणार आहे .
6/6

रामराज्य ते शिवराज्य अशी या शो'ची संकल्पना आहे. प्रेक्षकांसाठी हा टाइम मशीनमध्ये बसण्यासारखा अनुभव असणार आहे. रामराज्य ते शिवराज्य या शकडो वर्षांच्या इतिहासाचे टप्पे प्रेक्षकांना 36 मिनिटांत अनुभवता येणार आहेत. या शो'साठी नागरिकांना सहाशे रुपये तिकीट आकारण्यात येणार असून महापालिका शाळांमधील दोनशे रुपये सवलतीच्या दारात तिकीट उपल्बध असणार आहे. या शिवसृष्टीचे एकुण चार टप्पे असून त्यासाठी चारशे कोटींहुन अधिक खर्च येणार आहे.
Published at : 19 Feb 2025 04:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
सातारा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion