एक्स्प्लोर
Shivjayanti 2025 Shivneri Port: बाळाचं नाव ठेवलंय...शिवाजी शिवाजी शिवाजी! किल्ले शिवनेरीवर रंगला शिवजन्मोत्सवाचा सोहळा, PHOTO
Shivjayanti 2025 Shivneri Port: शिवनेरी किल्ल्यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याहस्ते शिवजन्माचा पाळणा जोजावण्यात आला.

Shivjayanti 2025 Shivneri Port
1/14

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे.
2/14

राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
3/14

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पुण्यातील किल्ले शिवनेरीवर आज (19 फेब्रुवारी 2025) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये 395 वा शिवजयंती सोहळा साजरा झाला.
4/14

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे,अजित पवार तसेच मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीमध्ये शिवनेरीवर शिवजयंतीचा हा सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
5/14

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याहस्ते शिवजन्माचा पाळणा जोजावण्यात आला.
6/14

शिवजन्माचा पाळणा जोजावण्यात आल्यानंतर उपस्थित महिलांनी याचं नाव ठेवलं शिवाजी, शिवाजी, शिवाजी...असं सांगितलं.
7/14

शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेनं दणाणून गेला.
8/14

लहान चिमुकल्यांनी यावेळी साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले.
9/14

शिवजंयतीच्या उत्साहाने शिवजन्मस्थान, शिवकुंज, शिवाईदेवी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
10/14

शिवनेरी किल्ल्यावरील दरवाजांना फुलांची तोरणे लावण्यात आली आहे. शिवनेरी किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवनेरी ही एक पवित्र वास्तू आहे जिथे शिवाजी महाराजांच्या अनेक आठवणी आहेत.
11/14

शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून अंदाजे 105 किलोमीटरवर आहे.
12/14

शिवनेरी किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. तसेच या गडावर मुख्य दारा शिवाय एक साखळी दार देखील आहे. या साखळीला धरून पर्यटक डोंगर चढून किल्यावर पोहोचतात.
13/14

किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरीवर बदामी तलाव नावाचे पाण्याचे तलाव आणि गंगा, यमुना नावाचे पाण्याचे झरे आहे, इथे वर्षभर पाणी भरलेले असते.
14/14

शिवनेरी मध्ये बरीच मौल्यवान ठिकाण बघायला मिळतात. या मध्ये एकूण 7 दार आहे, महादरवाजा, पीर दरवाजा, फाटक दरवाजा, हट्टी दरवाजा, परगंचना दरवाजा, कुल्बखत दरवाजा आणि शिपाई दरवाजांचा समावेश आहे.
Published at : 19 Feb 2025 09:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion