एक्स्प्लोर

Ganesh Utsav 2025: पीओपी आणि उंच गणेशमूर्तींना बंदी, मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड, मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकाने एकच खळबळ

Ganesh Utsav 2025: मुंबईतील गणेशोत्सवाबाबत मोठी बातमी. यंदा मुंबईत सार्वजनिक मंडळांना पीओपीच्या गणेशमूर्ती बसवण्यावर बंदी. मुंबई महानगरपालिकेचे परिपत्रक जारी

मुंबई: माघी गणपतीपाठोपाठ आता मुंबईत मोठ्याप्रमाणावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवातही नियमांची आडकाठी येण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या माघी गणेशोत्सवानंतर सार्वजनिक मंडळाच्या पीओपीच्या गणेशमूर्तींना  तलावांमध्ये विसर्जन (Ganesh Visrajan) करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. यावरुन बराच वादंग झाला होता. मात्र, मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासन शेवटपर्यंत ठाम राहिले होते. त्यामुळे काही माघी गणेशोत्सव (Maghi Ganesh Utsav) मंडळांनी यंदा त्यांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले नव्हते. यानंतर आता गणेश चतुर्थीपासून सुरु होणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवावरही पालिकेकडून अशाचप्रकारचे निर्बंध लादले जाण्याचे संकेत मिळत आहेत. (Ganesh Utsav 2025)

माघी गणेशोत्सवाप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील कोर्टाच्या नियमांचे सावट असेल. येणारा गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा, अशा आशयाचे परिपत्रक महानगर पालिकेकडून जारी करण्यात आले आहे.  त्यानुसार मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रात आगामी गणेशोत्सवात पूर्णपणे पीओपीच्या मूर्तींना बंदी असेल.  कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महानगर पालिकेने परिपत्रक जारी केले आहे.

सार्वजनिक उत्सव सन 2025 पर्यावरणपूरक पध्दतीने तसेच सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने, मूर्तीकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता आणि विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शनाकरिता सूचना करण्यात आल्या आहेत. पालिकेकडून नियमावली आल्याने आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,  मूर्तिकार आणि राजकीय नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे राहील. या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे हे शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. यानंतर पालिकेच्या निर्णयात बदल होणार का, हे पाहावे लागेल. 

 मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?

* मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल PIL 96 of 2024 मधील दिनांक ३०.०१.२०२५ रोजीच्या अंतरीम आदेशानुसार, पीओपी मुर्तीना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असून केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दि. १२.०५.२०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिलेले आहेत. सदर आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी...

* मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मुर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुर्तीकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली जाईल.

* सार्वजनिक / खाजगी जागेवरील मंडपांकरीता अर्ज सादर करतेवेळी गतवर्षीची मंडप परवानगी सोबत जोडण्यात यावी.

* मूर्तीकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असून खड्डे खणल्याचे आढळून आल्यास 2000 प्रती खड्डा याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

* येथे केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जातात असा फलक, मंडपाच्या प्रवेशव्दारावरील दर्शनी भागात्त सुस्पष्ट दिसेल अशा रितीने प्रदर्शित करावा

* उत्सवावादरम्यान मूर्तीचे आगमन आणि विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य राहील एवढया उंचीची मूर्ती घडविण्यात यावी

आणखी वाचा

माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम, समुद्रात विसर्जनासाठी अद्याप परवानगी नाही

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget