Manoj Jarange Parbhani : सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत होणार? मनोज जरांगेंनी सांगितली तारीख
Manoj Jarange Parbhani : सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत होणार? मनोज जरांगेंनी सांगितली तारीख
२५ फेब्रुवारीला महाराष्ट्रात ३ गॅझेट लागु होणार आणि ३ महिन्यांनी सगे सोयरेचा निर्णय आम्ही फडणवीसांचे स्वागत करणार सुरेश धसांनी राजीनामा द्यायला हवा होता त्यांना आम्ही लई जीव लावला होता सोमनाथ सूर्यवंशी,वाकोडे,संतोष देशमुख अन महादेव मुंडेंना न्याय मिळणार नाही त्यातले एक एक जण सोडले जाणार तेंव्हा राज्यात उद्रेक होईल धनंजय मुंडे हा पैसे अन पद अन राजकारणाला हपापलेला माणूस मनोज जरांगेचा आरक्षणावरून फडणवीसांवर विश्वास पण धस,मुंडें वर कडाडून टीका मनोज जरागे पाटील हे परभणी दौऱ्यावर आले होते त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या आठ मागण्यांपैकी चार मागण्या तात्काळ मंजूर केल्या होत्या. आता येणाऱ्या 25 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हैदराबाद सातारा आणि मुंबई गॅझेट लागू करतील आणि त्यांची आम्ही भव्य असे स्वागत करू असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा निर्णय 25 तारखेला शंभर टक्के जाहीर करतील असा ठाम विश्वासही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याशी गुप्त बैठक घेतल्या संदर्भात विचारले असता आमदार सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाने प्रचंड विश्वास टाकला होता. कधी नव्हे तो एका मराठा लोकप्रतिनिधी वर राज्यातला मराठा समाज प्रचंड प्रेम करीत होता. मी देखील सुरेश धस यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला. पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची वार्ता कळल्यानंतर मात्र आमचा विश्वास त्यांच्यावरला उडून गेला आहे. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला पाहिजे नव्हते. जरी त्यांच्यावर पक्षाने दबाव टाकला असला तरी सुरेश धस यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा समाजासमोर उभे राहिले असते तर मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते. आणि पुन्हा एकदा त्यांना दोन लाख मताच्या फरकांनी विजयी देखील केले असते. पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मराठा समाजाचा तर विश्वासघात केलाच पण माझा देखील त्यांच्यावरला विश्वास उडाला आहे. मंत्री धनंजय मुंडे हा पैसा पद आणि राजकारणाला हापापलेला माणूस धनंजय मुंडे यांना जनतेने मंत्री केला आहे जर जनतेला वाटत असेल की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता तर त्याने द्यायला पाहिजे होता पण धनंजय मुंडे हा पैसा पद आणि राजकारणाला आपापलेला माणूस आहे तो माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो आणि त्या पैशाच्या जीवावर राजकारण करतो आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर पदांचा राजीनामा दिला आहे पण हा माणूस एवढा हाप आपल्याला आहे की त्याला सत्तेतील खुर्ची सुटत नाही. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस पत्रकारांना उत्तर देताना स्पष्ट सांगितले की हे सरकार संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय देणार नाही. कारण संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर आत्तापर्यंत झालेल्या तपासात या सरकारने सह आरोपी कोणालाच केले नाही. साध्या साध्या आरोपानंतर कोणालाही इडी लावणारे हे सरकार वाल्मीक कराडला अद्यापही ईडी लावली नाही. अद्यापही आरोपी मोकाट आहेत तसेच मोबाईल मधील डाटा देखील अद्याप समोर आणलेला नाही. त्यामुळे आम्हाला वाटत आहे की हे सरकार संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय देणार नाही.























