एक्स्प्लोर

Sangli Crime: आईशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत कामगाराला दगडाने ठेचून मारलं, सांगली हादरली

Sangli Crime : सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर एका कामगाराला दगडाने ठेचून संपवल्याची घटना घडली आहे.

Sangli Crime : सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर (Sangliwadi- Kadamwadi Road) गुरुवारी (दि. 20) दुपारी एका कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना (Sangli Police) यश आले आहे. आईबरोबर कामगाराचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांसोबत ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर दत्ता सुतार (35 रा. इंदिरानगर, सांगली) या कामगार खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. मृतदेहाजवळच मृताची दुचाकी आढळून आली होती. हल्लेखोरांनी दगडाने कामगाराला ठेचले. यामुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होती. 

तीन जणांना अटक

याबाबत शहर पोलीस ठाण्यास माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. घटनास्थळी हल्लेखोरांनी चाकू व कोयता टाकला असला तरी त्यावर रक्ताचे डाग दिसत नव्हते. यामुळे या हत्याराचा वापर केला गेला की नाही? याचा उलगडा होत नव्हता. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासातच तीन संशयितांना ताब्यात घेतले. या तिघांची चौकशी केली असता एकाने त्याच्या आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध होते. या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे. पोलीस तपासात तिघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज (दि. 21) या तिघांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 

सांगलीत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यास बेड्या

दरम्यान, सांगलीतील वॉन्लेसवाडी परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केले आहे. अरबाज उर्फ इब्राहिम अल्लाउद्दीन रेठरेकर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अरबाज रेठरेकर हा वॉन्लेसवाडी येथील एका बंद पडलेल्या कंपनीच्या इमारतीत पिस्तूल घेऊन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime: आधी गोळ्या झाडल्या अन् डोक्यात चाकू खुपसला! रक्ताने माखलेला रंजित जीवाच्या आकांताने इमारतीत शिरला, मदतीसाठी अनेक घराची बेल वाजवली पण...

Pune Police: दारुड्यांना हटकलं म्हणून पोलिसालाच डांबून मारलं; पोलिसांनी दिला मिटवण्याचा सल्ला, आता न्याय कुठं मागायचा?

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget