Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Ajit Pawar on Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत भाष्य करताच राष्ट्रवादीच्या शिबिरात टाळ्यांचा कडकडाट दिसून आला.
Ajit Pawar : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. आज राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा. मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे, असे त्यांनी म्हटले. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषण करताना धनंजय मुंडे यांच्याबाबत भाष्य करताच शिबिरात टाळ्यांचा कडकडाट दिसून आला.
राष्ट्रवादीच्या शिबिरात अजित पवार म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले आपण किती वाजता सकाळी उठता? ते म्हणाले मी साडे तीन तास झोपतो. योगा करतो आणि शरीराला वेळ देतो. सर्व कुटुंबाची तपासणी करून घ्या, असंही ते म्हणाले. मी देखील तुम्हाला हेच सांगतो की, आरोग्य तपासून घ्या, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. तर शिबिरात उशिरा येणाऱ्या नेत्यांना त्यांनी मिश्कील टोला देखील लगावला.
अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट
धनंजय मुंडे यांच्याबाबत जे वादळ उठलं होतं ते आज थांबवण्याचे काम आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांनी केले आहे, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या बोलताच शिबिरात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाल्याचे दिसून आले. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जे इच्छुक आहेत त्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि 25 घरावर काम केलं पाहिजे. म्हणजे एका घरात 4 मतं धरली तर 100 मतं मिळतील. प्रभागात प्रत्येक उमेदवाराने 50 कार्यकर्ते तयार केले तर आपण 20 हजार मतापर्यंत पोहोचू शकतो. प्रत्यकाने 100 मतांपर्यंत पोहोचायचे आहे, असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच अधिकाधिक तरुणांना पक्षात आणायचं आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांना पक्षात आणायचं आहे. राज्यातील प्रत्येक गावात, चौकात झेंडा लागेल, पक्षाचा बोर्ड लागेल याची काळजी घेतली पाहिजे. गावागावात कार्यकर्ता तयार होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही अजित पवार यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या