एक्स्प्लोर
शेतकऱ्यांनी अरबी समुद्रात फेकलं सोयाबिन अन् 7/12 उतारे; पोलिसांना चकवा, बोटीतून आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातून शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेनं आला.
Farmers thrown soyabin in mumbai sea
1/8

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातून शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेनं आला. मात्र, हा शेतकरी मोर्चा पोलिसांनी खालापूर येथे अडवून ठेवल्यानं, शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले होते.
2/8

पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या तरी आपण मुंबईत जाणारच, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जीवाला काही झाल्यास याला पोलीस आणि सरकार जबाबदार असल्याचे तुपकर यांनी म्हटले होते. मात्र, अखेर ते काही शेतकऱ्यांसह मुंबईत पोहोचलेच.
3/8

तुपकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज त्यांनी मुंबईत येऊन आंदोलन केले. 17 मार्चच्या सायंकाळीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांचे घर आणि ऑफिसला वेढा टाकला होते. त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना अर्ध्या रात्री झोपेतून उठवून पोलिसांकडून जबरदस्तीने धरपकड करण्यात आली.
4/8

याही परिस्थितीत कर्जाचे सातबारे समुद्रात बुडवणारच म्हणत गनिमी पद्धतीने भूमिगत होत रविकांत तुपकर मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मुंबईत पोहोचले आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं
5/8

एकीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असताना दुसरीकडे तुपकर यांचे समर्थक गमीनी काव्याने बोटीच्या माध्यमातून अरबी समुद्रात पोहोचले.
6/8

शेतकरी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत सोयाबीन, कापूस आणि सातबाऱ्याचे पेपर समुद्रात बुडवले, तसेच आपल्यासोबत आणलेला सोयाबिन देखील समुद्रात फेकून सरकारचा निषेध केला.
7/8

सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार, शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, कापूस व सोयाबीन प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक द्यावा, अशी मुख्य मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेची आहे.
8/8

कांदा,दूध व धान उत्पादकांना अनुदान द्यावे, ऊसाला एकरकमी एफआरपी, जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड, कल्याण रेल्वे मार्गामुळे विस्थापित होत असलेल्या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे, अशा मागण्या संघटनेकडून केल्या जात आहेत
Published at : 19 Mar 2025 03:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण


















