Malegaon Blast Case : मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
Malegaon Blast Case : मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. 100 हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

Malegaon Blast Case : देशाला हादरवून सोडणाऱ्या 2008 मधील मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलून मुबंईत आणण्याचे आदेश दिले होते, अशी सनसनाटी माहिती समोर आली आहे. तत्कालीन दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी मेहबुब मुजावर यांना परमबीर सिंह यांनी हा आदेश दिला होता. मात्र, हा आदेश तोंडी आणि बेकायदेशीर असल्याने तत्कालिन एटीस अधिकारी मेहबूब मुजावर यांना गोवण्यात आल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात करण्यात आला.
या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी
मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. 100 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या खटल्याचीमुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू आहे. गुरुवारी न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत या खटल्यातील आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी यांच्यावतीने अॅड. रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक युक्तिवाद केला.
मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश
रणजित सांगळे म्हणाले की, तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी एकेदिवशी बोलावून आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते. मात्र, हा आदेश बेकायदेशीर आणि कोणत्याही लिखित स्वरुपात नसल्याने मुजावर यांनी परमबीर सिंह यांच्या आदेशाचं पालन केलं नाही. त्यामुळे तोंडी आदेशाचे पालन न केल्याने सोलापुरातील एका खोट्या प्रकरणात मुजावर यांना गोवण्यात आलं. माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी सोलापूर न्यायालयात कलम 313 मध्ये दिलेल्या जबाबात ही माहिती होती. संदीप डांगे आणि रामचंद्र कालसंग्रा या दोघांचा एटीएसच्या कोठडीत मृत्यू झाला तरीही त्यांना या केसमध्ये फरार आरोपी दाखवण्यात आल्याचा दावाही मुजावर यांनी मीडियासमोर केला होता.
माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी आधीच मीडियाला माहिती देताना सांगितले की, संदीप डांगे व रामचंद्र कलसांग्रा एटीएसच्या कोठडीत मृत्यू पावले होते. परंतु विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एटीएसच्या आरोपपत्रात त्या दोघांना जिवंत दाखवण्यात आले. आता एटीएसला ते हवे आहेत, असे वकील सांगळे यावेळी म्हणाल्याची माहिती आहे. या खुलाशामुळे परमबीर सिंह यांचे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाशी असणारा संबंध उजेडात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

