Nashik News : नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
Nashik News : नाशिकच्या पेठ तालुक्यातील रुई पेठा गावात आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महिलेच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत.

Nashik News : नाशिकच्या पेठ (Peth) तालुक्यातील रुई पेठा गावात आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जखमी अवस्थेत महिलेला जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून महिलेच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शोभा भिवसन या महिलेला जखमी अवस्थेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. ही लाकूड आणण्यासाठी घराबाहेर गेली होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
घातपात आहे की अपघात?
महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा असल्याने घातपात आहे की अपघात याविषयी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग
दरम्यान, नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बांबूच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर आजूबाजूची काही दुकानांना देखील आग लागली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

