एक्स्प्लोर

Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले

Beed News: सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा. मुंडेंची राष्ट्रवादी नव संकल्प शिबिरातून मागणी. बीड म्हणजे बिहार आणि परळी म्हणजे तालिबान, अशी भयानक खोटी प्रतिमा तयार केली जात आहे ? मुंडेंची नाराजी

शिर्डी (प्रतिनिधी): मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट  वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र, तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे! अजित दादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंदच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित नव संकल्प शिबिराच्या व्यासपीठावरून ते बोलत होते.

बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व.संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, याबद्दल धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली .

तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले: धनंजय मुंडे

पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो. अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१४ - १९ या काळात विरोधी पक्षनेतेपदी काम केले. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य यात्रांमध्ये सहभागी होऊन सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले. 

२०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही धनंजय मुंडे यांनी आज प्रथमच बोलून दाखवली. सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी चांगले काम करून दाखवले. गाव - वस्त्यांची जाती वाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय त्याकाळात घेतले.  ११ हजार कोटी रुपये पीकविमा एका वर्षात मिळवून देणारा कृषिमंत्री मी, मात्र त्यावरूनही टीका झाली. मात्र अर्धवट माहिती देऊन बदनामी करणारे लोक यावर बोलत नाहीत, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

परळीत मी मोठ्या लीडने निवडून आल्याने अनेकांच्या पोटात दुखतंय: धनंजय मुंडे

लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी जाऊ नकोस अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मात्र तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले. मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या लिडने निवडून आलो, त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहे, हेही उघड झाले. 

विधानसभा निवडणुकीत मी केवळ पाच दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत मी पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले, असेही मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

मी काम करणारा कार्यकर्ता

मी सतत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता फक्त नावाला आहे. माझ्यातला कार्यकर्ता कधीच मरणार नाही. मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्ष नेतृत्वाने पाँडिचेरी मध्ये जाऊन पक्ष विस्ताराचे काम कर म्हंटले तर तिथे जाऊन मी काम करेल. पक्षाला सुद्धा कार्यकर्ताभिमुख व्हावे लागेल. कार्यकर्त्याला ताकत देताना संपूर्ण विश्वास देखील ठेवणे आवश्यक आहे, तेव्हाच पक्ष संघटना मजबूत होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

बीड जिल्हा अन् सामाजिक सलोखा

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारनानंतर झालेल्या मीडिया ट्रायल, सोशल मीडियावरील चिखलफेक, साधलेले राजकारण अशा अनेक गोष्टींनी जिल्ह्याचे सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. आपला पक्ष शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे आता आमच्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी सुद्धा सर्वांना घ्यावी लागेल. ऊसतोड करून, कष्ट करून, कोरडवाहू शेती करून जगणारे आम्ही सामान्य लोक आहोत. आमचा जिल्हा बिहार आणि आमची परळी तालिबान नाही. अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे, बारा ज्योति्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ यांच्या दर्शनाला भाविक येतील का, अशी भीती वाटत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

आणखी वाचा

पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं

व्हिडीओ

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Embed widget