(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yavatmal: यवतमाळ येथे महिलेचा गळा चिरून रस्त्यावर फेकलं, एकास अटक
Yavatmal: यवतमाळ शहरातील धामणगाव बायपास मार्गावर एका महिलेला मारहाण करून तिचा गळा चिरून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उडघकीस आली.
Yavatmal: यवतमाळ शहरातील धामणगाव बायपास मार्गावर एका महिलेला मारहाण करून तिचा गळा चिरून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उडघकीस आली. अनैतिक संबंधातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी प्रियकरास अटक केली आहे.
यवतमाळ शहरातील धामणगाव बायपास धारीवाल रेसिडेन्सीच्या मागील बाजूच्या वीटभट्टीजवळ एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. या महिलेचा धारदार शस्त्रानं गळा चिरल्याचं पोलिसांच्या लक्षात आले.
अर्चना क्षीरसागर (रा.गोदाम फैल,यवतमाळ) असे जखमी महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचरासाठी दाखल केले. दरम्यान अर्चनावर हा हल्ला कोणी केला? का केला? हे प्रश्न निरुत्तर होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अर्चना क्षीरसागर हिचा प्रियकर शाहरुख खान बहादूर खान (रा. नेताजीनगर,यवतमाळ) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता शाहरुखचं गेल्या वर्षभरापासून या महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली.
अर्चना ही विवाहित असून ती आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे. तीचे शाहरुख सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. दरम्यान, अर्चना गेल्या काही दिवसांपासून शाहरुख पासून दूर होती. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. ती भेटण्यास ही नकार देत होती. तिचे इतर कोणाशी प्रेम प्रकरण सुरु असल्याची तिनं शाहरुखला कबूली दिली. याचाच राग मनात ठेवून शाहरुखने अर्चनाला यवतमाळच्या स्टेट बँक चौकात बोलवलं. त्यानंतर तिला वीटभट्टी परिसरात नेले. तिथं दोघे बोलत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी शाहरुखनं रागाच्या भरात आपल्या खिशात आणलेल्या कटरनं सरळ अर्चनचा गळा चिरला आणि तिथून पळून गेला. आज यवतमाळ शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शाहरुखला अटक केली.
अनैतिक संबंधला नकार अर्चना देत होती त्यामुळे मारल्याची कबुली शाहरुखने पोलिसांना दिली आहे. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे सपोनि जनार्धन खंडेराव अजय डोळे, प्रदीप नाईकवाडे, सूरज साबळे, निलेश भुसे, कमलेश भोयर, संतोस व्यास यांनी केली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून जखमी महिला ही रुग्णालयात उपचार घेत आहे.
हे देखील वाचा-
- Ulhasnagar: उल्हासनगरात धुळवडीच्या दिवशी भरदुपारी एकाची हत्या, आरोपीला अटक
- Bhandara: क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या करून मृतदेह वैनगंगा नदीत फेकला, चौघांना अटक
- सोलापुरात उसतोड कामगारांकडूनच हत्या आणि दरोडा, 6 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha