एक्स्प्लोर

Ind Vs Ban Champions Trophy: टीम इंडिया आज बांगलादेशला भिडणार, फायनल 11 मध्ये कोणाकोणाला संधी? हे दोन खेळाडू ठरु शकतात भारतीय संघासाठी धोका

Champions Trophy 2025 Ind vs Ban: चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशचा संघ टीम इंडियाला धक्का देणार का? बुमराह नसल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडण्याची शक्यता.

दुबई: क्रिकेट विश्वातील प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक असणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ गुरुवारी पहिला सामना खेळणार आहे. या सलामीच्या सामन्यात भारताची गाठ बांगलादेशी संघाशी पडणार आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशी संघ हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात काय घडणार, याची उत्सुकता भारतीय क्रिकेटप्रेमींना लागली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल असल्या तारांकित खेळाडुंचा भरणा असलेली टीम इंडिया कागदावर बांगलादेशच्या संघापेक्षा सरस मानली जात आहे. मात्र, भारताचा प्रमुख गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार नाही. ही भारतीय संघाची सर्वात मोठी उणीव मानली जात आहे. बांगलादेशचा संघ हा धक्कादायक निकालांची नोंद करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बांगलादेशी संघ टीम इंडियाला धक्का देण्याचा शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

बांगलादेशने अलीकडच्या काळात 'आयसीसी'च्या स्पर्धांमध्ये अनेकदा भारतीय संघाला कडवी झुंज दिली आहे. आजच्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतो आणि मेहिदी हसन मिराज हे दोन खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतात. हे दोन खेळाडू कोणत्याही क्षणी सामन्याचा नूर पालटू शकतात. मेहिदी हसन मिराज अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार कामगिरी केल्यास भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात. याशिवाय, मुशफिकूर रहीम आणि महमुदुल्ला या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर बांगलादेशचा संघ धक्कादायक निकालाची नोंद करु शकतो.

टीम इंडियाने यापूर्वी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेवटचे जेतेदप जिंकले होते. तर 2017 मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानी संघाने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भारतीय संघाला निश्चितच भासेल. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात, हे बघावे लागेल.

अंतिम 11 खेळाडुंमध्ये कोणाकोणाला स्थान?

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या अंतिम 11 खेळाडुंच्या संघात कोणाकोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरच्या लेफ्ट-राईट कॉम्बिशेनच्या आग्रहामुळे केएल राहुल कोणत्या क्रमांकावर खेळणार हे बघावे लागेल. तसेच मोहम्मद शामीसोबत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यापैकी कोणाला पसंती मिळणार, हे बघावा लागेल. याशिवाय, तिसरा स्पिनर म्हणून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यापैकी कोणाची संघात वर्णी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

Ind vs Ban Dubai Update : रोहित टेन्शनमध्ये! भारत-बांगलादेश सामन्यावर संकट, टीम इंडियाचा सगळा प्लॅन धुळीस मिळणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
T20 WC : फायनलपूर्वी सँटनरची धमकी, अहमदाबादमध्ये 140 कोटी भारतीयांची धडधड वाढवणार
T20 WC : फायनलपूर्वी सँटनरची धमकी, अहमदाबादमध्ये 140 कोटी भारतीयांची धडधड वाढवणार
मोठी बातमी : अभिषेक शर्मा फायनलमध्ये खेळणार की नाही? टीम इंडियाच्या प्लेईंग 11 ची ताजी अपडेट समोर
मोठी बातमी : अभिषेक शर्मा फायनलमध्ये खेळणार की नाही? टीम इंडियाच्या प्लेईंग 11 ची ताजी अपडेट समोर
IND vs NZ : फायनलमधून वरुणला हटवा, कुलदीपला खेळवा, दिग्गजांची मागणी, आकडेवारी काय सांगते?
IND vs NZ : फायनलमधून वरुणला हटवा, कुलदीपला खेळवा, दिग्गजांची मागणी, आकडेवारी काय सांगते?

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget