Bhandara: क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या करून मृतदेह वैनगंगा नदीत फेकला, चौघांना अटक
Bhandara: क्षुल्लक कारणावरून 4 मित्रांनी मिळून तलवारीनं वार करत एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरात उघडकीस आली आहे.
Bhandara: क्षुल्लक कारणावरून 4 मित्रांनी मिळून तलवारीनं वार करत एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरात उघडकीस आली आहे. एवढेच नव्हेतर, हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मृतदेह वैनगंगा नदीत फेकून दिला. याप्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. महेंद्र दहीवले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. शुभम नंदूरकर (वय, 19), निशांत कटकवार (वय, 20) दीपांशु शहारे (वय, 21), हेमंत पांडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे.
मृतक महेंद्र दहीवले हा बेला गावातील रहिवाशी असून 10 मार्च पासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार भंडारा शहर पोलिसाना 14 मार्चला प्राप्त झाली होती. त्या अनुषंघानं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मृतकानं 9 मार्च लाआपल्या मित्रासोबात पार्टी केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी पार्टी उपस्थित लोकांची फेर तपासणी केल्यावर आरोपी शुभम आणि मृतकाचे पार्टी दरम्यान जोरदार भांडण झाले असल्याचे उघड झाले. यावेळी मृतक महेंद्रनं आरोपी शुभमला मारहाण केली होती. दुसऱ्या दिवशी 10 मार्चला आरोपीनं आपल्या मित्रासोबत मृतकाचा घरी जाऊन भांडण केले होते. यात शुभमच्या मनात काही अजुन कट शिजत असल्यानं त्यानं मृतक महेंद्रला माफी मागत आपल्या सोबत पार्टीला घेऊन गेला. दरम्यान, कारधा नदीच्या पुलावर दारू पार्टी झाल्यावर आरोपी शुभम यांनी महेंद्रला पुन्हा मारहाण सुरु केली आणि तलवारीनं वार केले. ज्यामुळं महेंद्रचा मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपींनी महेंद्रचा मृतदेह नदीत फेकून दिला. तसेच मृतदेह बाहेर येऊ नये म्हणून बासानं बांधून ठेवले. आरोपीच्या कबूली जबाबानंतर चारही आरोपीला अटक करण्यात आली आहे. भंडारा शहर पोलिसांनी नदीतुन मृतदेह हस्तगत करीत आरोपी विरुद्ध भंडारा शहर पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद केला गेला आहे.
हे देखील वाचा-
- सोलापुरात उसतोड कामगारांकडूनच हत्या आणि दरोडा, 6 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
- संतापजनक...! पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना; नराधम पित्यासह भाऊ, आजोबा, मामाकडून 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Hijab Row : हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना वाय दर्जाची सुरक्षा, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha