एक्स्प्लोर

छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आम्हाला शाळेत का नाही शिकवला? 'छावा' पाहिल्यानंतर माजी क्रिकेटपटूचा थेट सवाल, म्हणाला...

Ex Cricketer Asked Question On Chhaava: फक्त प्रेक्षकच नाहीतर, सिनेमा क्रिटिक्सही या सिनेमाची चर्चा करत आहेत. चित्रपटाची भव्यता, शंभू राजांचा पराक्रम आणि त्यांचा त्यानंतर त्यांचा त्याग, सारं पाहून प्रत्येकजण हळहळला आहे.

Ex Cricketer Aakash Chopra Asked Question On Chhaava: छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि त्यांची किर्ती रुपेरी पडद्यावर दाखवणाऱ्या 'छावा' चित्रपटाची (Chhaava Movie) चर्चा फक्त देशभरातच नाहीतर संपूर्ण जगभरात सुरू आहे. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल (Vicky Kaushal) दिसून आला आहे. तर, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) साकारली आहे. फक्त प्रेक्षकच नाहीतर, सिनेमा क्रिटिक्सही या सिनेमाची चर्चा करत आहेत. चित्रपटाची भव्यता, शंभू राजांचा पराक्रम आणि त्यांचा त्यानंतर त्यांचा त्याग, सारं पाहून प्रत्येकजण हळहळला आहे. चोहीकडे चित्रपटाचीच हवा असताना टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूनं मात्र, एक प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

'छावा'मुळे मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आका श चोप्रानंही 'छावा' पाहिला. पण, चित्रपट पाहिल्यानंतर त्याला राहावलं नाही आणि त्यानं प्रश्न उपस्थित केला. सध्या त्याच्या या प्रश्नाची जोरदार चर्चा होत आहे. आकाश चोप्रानं आमच्या शाळेच्या इतिहासातील पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेखही नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच, ज्यावेळी अकबर आणि औरंगजेबांसारख्या मुघल शासकांबाबत शिकवलं गेल्याबाबतही त्यानं आश्चर्य व्यक्त केलंय. 

'छावा' पाहिल्यानंतर आकाश चोप्रानं एक ट्वीट केलंय. त्यात त्यानं म्हटलंय की, "आज 'छावा' पाहिला... शौर्य, निस्वार्थता आणि कर्तव्यभावनेची अविश्वसनीय कहाणी... शाळेत आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबाबत काही शिकवलं गेलं नाही? कुठेही उल्लेख नाही, हा खरा प्रश्न आहे. अकबर एक महान, न्याय ,सम्राट कसा? हे आम्हाला शिकवलं गेलं आणि दिल्लीत औरंगजेब रोड नावाचा एक रस्तादेखील आहे... हे का, कसं घडलं?" 

अक्षय चोप्राच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. काहींनी त्यानं मांडलेल्या विचारांचं समर्थन केलं. तर, काहींनी धार्मिक आणि राजकीय गोष्टींमध्ये अडकल्याबद्दल त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

"चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंतचा धडाकेबाज पोलिसी खाक्या, पोस्टरसह टीझरही समोर, कधी होणार रिलीज?
‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंतचा धडाकेबाज पोलिसी खाक्या, पोस्टरसह टीझरही समोर, कधी होणार रिलीज?
रीलवर केलेल्या एका लाईकवरून यामी गौतम कृती सेननमध्ये कोल्ड वॉर? यामीनं थेट पोस्ट लिहिली ..
रीलवर केलेल्या एका लाईकवरून यामी गौतम कृती सेननमध्ये कोल्ड वॉर? यामीनं थेट पोस्ट लिहिली ..
Charak Fair of Faith Review: चरक ‘कांतारा’ची डुप्लिकेट नव्हे तर पायरेटेड कॉपी? पूर्ण चित्रपट पाहणंही ठरेल कठीण
चरक ‘कांतारा’ची डुप्लिकेट नव्हे तर पायरेटेड कॉपी? पूर्ण चित्रपट पाहणंही ठरेल कठीण

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget