(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापुरात उसतोड कामगारांकडूनच हत्या आणि दरोडा, 6 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
सोलापूर : बोरामणी-दर्गनहळ्ळी गावात झालेल्या हत्या आणि दरोड्याची उकल झालीय. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शिताफिने तपास करत या प्रकरणातील सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सोलापूर : बोरामणी-दर्गनहळ्ळी गावात झालेल्या हत्या आणि दरोड्याची उकल झालीय. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शिताफिने तपास करत या प्रकरणातील सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. नगर) हा या टोळीचा म्होरक्या आहे. तर अजय देवगण उर्फ देवगण सपा शिंदे, सुनिल उर्फ गुल्या सपा शिंदे (दोघेही रा. शेळगाव, ता. परांडा), ज्ञानेश्वफर लिंगु काळे (रा. पांढरेवाडी, ता. परांडा), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम), संतोष झोडगे (रा. डोकेवाडी, ता. भूम) असे या आरोपींचे नाव आहेत. विशेष म्हणजे आरोपी संतोष झोडगे वगळता सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तर अक्षय काळे, अनुज भोसले हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
सोालपुरातील बोरामणी-दर्गनहळ्ळी गाव परिसरात मार्च रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी प्रचंड दहशत माजवली होती. गावातील शरणप्पा पाटील यांच्या घरावर दरोड्याचा या टोळीने प्रयत्न केला होता. पण ग्रामस्थ जागे झाल्याने त्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. मात्र दरोड्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर या टोळीने काही अंतरावर राहणाऱ्या हिरजे यांच्या घरावर दरोड्याचा प्रय़त्न केला. यामध्ये सुलोचना हिरजे यांच्या गळ्यातील दागिने दरोडेखोरांनी हिसकावून घेतले. यावेळी दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या बाबुराव हिरजे या वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने बाबुराव हिरजे यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. बाबुराव हिरजे यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून त्यांच्या पत्नी सुलोचना हिरजे यांचे हात-पाय बांधून दरोडेखोरांनी पळ काढला होता. या घटनेची संवेदनशीलता ओळखून कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी देखील घटनास्थळी जाऊन भेट दिली.
उसतोड कामगारच निघाले दरोडेखोर
तसेच या घटनेच्या तपासासाठी सोलापूर पोलिसांची चार तपास पथके नेमण्यात आली. पोलिसांच्या तपासात बोरामणी-दर्गनहळ्ळी गावात उसतोड कामगारांची एक टोळी येऊन गेल्याचे लक्षात आले. हाच धागा पकडून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये उसतोड कामागार कोण आहेत याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच घटनेतील साक्षीदारांकडून आरोपींचे स्केच तयार करुन घेण्यात आले. गुन्ह्याचा तपास सुरु असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील उसतोड करणाऱ्या टोळीतील मजूर या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय बातमीदाराद्वारे मिळाली होती. या संशियाताला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर इतरही आरोपींचा सुगावा पोलिसांना लागला. नगरमधील जामखेड तालुक्यातून दोन, बीडमधील वाडवान येथून एक, पुण्यातील लोणीकाळभोर येथून दोन तर उस्मानाबादच्या भूम येथून एक अशा सहाही आरोपींना पोलासांच्या चार पथकांनी ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान ज्या शरणप्पा पाटील यांच्या घरावर पहिल्यांदा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांच्यासोबत उसतोड करताना आरोपींपैकी एकाचे वाद देखील झाल्याचे समोर आले आहे. त्याच वेळी ह्या दरोड्याचा प्लॅन ठरला असल्याची माहीती समोर येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- संतापजनक...! पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना; नराधम पित्यासह भाऊ, आजोबा, मामाकडून 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- होळीनिमित्त जयपूरला आलेल्या परदेशी तरुणीवर अत्याचार, पळून जाण्याच्या प्रयत्नात होता आरोपी
- Hijab Row : हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना वाय दर्जाची सुरक्षा, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha