एक्स्प्लोर

ग्रामदेवताः अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवी

अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावाची ओळख आणि नाव देखील अकलाई या ग्रामदेवतेच्या नावावरून पडलं. शेकडो वर्षांपूर्वी पूर्वाश्रमीचे असतपूर अकलूज या नावाने प्रसिद्धीस आले. म्हणूनच आजही पंचक्रोशीत अपत्य जरी जन्माला आले तरी पहिल्यांदा अकलाई मातेच्या चरणी त्याला आणलं जातं. अकलूजमध्ये ग्रामपंचायत असली तरी कोणत्याही मोठ्या शहरांशी स्पर्धा करेल अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत. राजकीयदृष्ट्या कायम सत्तेत राहिल्याने याचा फायदाही या गावाला मिळाला. पण येथील आजचे मंदिर पहिले तर एवढ्या गोंगाटात देखील अतिशय शांत आणि पावित्र्य जपत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली अकलाई माता नीरा नदीच्या काठावरील शांत भागात अकलाई माता अकलूज मध्ये विसावली आहे . मंदीराच्या प्रवेशाच्या ठिकाणी भव्य कमान, अतिशय रेखीव आणि आकर्षक पद्धतीने बांधलेले दगडी मंदिर, उंच कळस, समोरची भव्य दगडी दीप माळ, संपूर्ण मंदीर परिसर संरक्षक भिंतीने बंदिस्त केलेला, मंदीराच्या वाटेवर पायघड्या घातलेले बारीक हिरवे गवत, पायऱ्या चढून गेल्यावर उभारलेला भव्य सभा मंडप आणि गाभाऱ्यात अकलाई मातेची प्रसन्न मूर्ती... हे सर्व पाहताच कोणत्याही भाविकाचं मन हरपून जातं. मंदीर परिसरात वृक्षांची लागवड करण्यात अली असून त्याच्याखाली विविध आकाराचे कट्टे बनवले आहेत. या ठिकाणी भाविक सावलीत या रमणीय ठिकाणाचा आनंद घेऊ शकतात . पूर्वीचे मंदीर हे अतिशय छोटेखानी आणि मातीचे बांधलेले होते. पूर्वजांच्या सांगण्यानुसार 1000 ते 1200 वर्षांपूर्वीचे हे मंदीर असल्याचं बोललं जातं. काशी खंडात देखील या मंदिराचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येतं. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना जुन्या मंदीराचे तैलचित्र या ठिकाणी लावण्यात आले आहे. सध्या या मंदिराचा कारभार ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येतो. बांधकामासाठी आतापर्यंत 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दर्शनाला आणि मुक्कामाला येणाऱ्या भाविकांसाठी धर्मशाळा उभारण्यात अली असून अजूनही 5 ते 6 कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत . देवीच्या अख्यायिका पुराणकाळात अंकलेश्वर हा दानव ऋषी मुनींना त्रास देऊ लागल्यानंतर त्यांनी पार्वती मातेची आराधना केली आणि पार्वती मातेने अकलाई देवीचे रूप घेऊन या अंकलेश्वराचा या परिसरात वध केल्याची मूळ कथा या मंदीराबाबत सांगितली जाते. काही वर्षांपूर्वी नीरा नदीला पूर आला होता. यावेळी जनावरे चरणाऱ्या गुराख्याच्या गाईच्या पायात काही तरी अडकल्यावर त्याने काय हे पाहताना ही अकलाई मातेची मूर्ती आढळली. गुराख्याने ती बाहेर काढली. त्याचवेळी गावच्या पाटलाला देवीने दृष्टांत देत आपल्याला अकलूजमध्ये स्थापन करण्यास सांगितल्यावर शेकडो वर्षांपूर्वी हे मंदिर उभारल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. मात्र पुराणातील काशी खंडासोबत यादवकाळ आणि छत्रपतींच्या काळात देखील अकलूजचा उल्लेख आढळतो. या मंदीराला नवरात्राच वेगळंच सौंदर्य लाभतं. आश्विन शुद्ध नवरात्रात नऊ दिवस विविध कार्यक्रम साजरे केले जातात. कोजागिरीपूर्वी 3 दिवस देवी मंचकी निद्रेला जाते आणि कोजागिरीला दुधाचा नैवेद्य दाखवून देवीला जागे करण्यात येते. यानंतर गावातील भाविकांच्या वतीने महाप्रसादाचं, भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. VIDEO : ग्रामदेवताः सोलापूरः अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवी पाहा व्हिडिओः ग्रामदेवताः

रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत 'श्री देव भैरी' 

ग्रामदेवता : विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान पातूरची रेणूका माता

ग्रामदेवता : खरसुंडी गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसिद्धनाथ

ग्रामदेवता : खान्देशातील भाविकांचं श्रद्धास्थान यावलची श्रीमनुमाता

ग्रामदेवताः महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचा आधारवड विठ्ठलाई

ग्रामदेवता: अमरावतीतील स्वयंभू पिंगळाई देवी

ग्रामदेवता: बुलडाण्यातील खामगावची श्री जगदंबा

ग्रामदेवता: परभणीतील मानवतचा मोठा मारुतीराया

ग्रामदेवता : सांगलीतील विटावासियांचं ग्रामदैवत श्रीभैरवनाथ

ग्रामदेवता: धुळ्याच्या साक्री तालुक्यातील श्रीधनदाई देवी

ग्रामदेवता : हातकणंगलेतील पट्टणकोडोलीचा श्रीबिरदेव

ग्रामदेवताः नाशिक जिल्ह्यातील नांदगावची ग्रामदेवता एकवीरा देवी

ग्रामदेवता : आदिवासींचं कुलदैवत, बर्डीपाड्याची देवमोगरा देवी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Embed widget