Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला एका मागे एक धक्के बसत आहेत. आता शिंदे गटाच्या नेत्याने मोठा केला आहे.

Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) गळती लागल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. तर कोकणातील ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) हे दोन शिलेदार ठाकरेंकडे राहिलेले आहेत. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी भास्कर जाधव आणि वैभव नाईक हे शिंदे गटात येतील, असा दावा केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजय शिरसाट यांनी आज मंगळवारी (दि. 18) माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूमच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा को-ऑर्डिनेशन रूम सुरू केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात समांतर सरकार चालवायला सुरुवात करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, हे सरकार महायुती सरकार आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करत आहोत. आम्ही समांतर सरकार चालवत नाही. कुणी काय काम करायला हवं, यावर आम्ही काम करत आहोत, असे त्यांनी म्हटले.
भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक बोलावण्यात आली आहे. खासदार, आमदारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरेंकडे खासदार किती आहेत, त्यातील तीन चार गैरहजर असतात. उद्धव ठाकरे बैठक घेतायत, याचे कारण त्यांच्यासोबत किती खासदार किती आहेत याचा ते आढावा घेत आहेत. राजन साळवी सांगत होते की, येणार नाही पण ते आले ना. आता वैभव नाईक आणि भास्कर जाधव देखील येतील. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकमेकांनी ठरवावे की आता कोण कोणाला कंटाळून पक्षातून जात आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
























