JanNivesh SIP : छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा, जाणून घ्या प्रमुख गोष्टी
JanNivesh SIP : स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडनं जननिवेश एसआयपी योजना सुरु केली आहे. या माध्यमातून 250 रुपयांपासून गुंतवणुकीचा पर्याय सुरु करण्यात येणार आहे.

JanNivesh SIP मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं एसबीआय म्युच्युअल फंडनं जननिवेश एसआयपी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे नवगुंतवणूकदार 250 रुपयांपासून एसआयपी करु शकतात. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे एसआयपीतील गुंतवणूक दैनंदिन, साप्ताहिक आणि दरमहा करता येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करुन सर्वसामान्य नागरिक गुंतवणुकीचा प्रवास सुरु करतील, अशी अपेक्षा आहे.
जननिवेश एसआयपी कुणासाठी फायदेशीर?
विद्यार्थी, नव गुंतवणूकदार, व्यापारी आणि छोटी बचत करणारे सर्व लोक जननिवेश एसआयपीसह गुंतवणुकीचा प्रवास सुरु करतील. जननिवेश एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक एसबीआय बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडमध्ये केली जाईल. एसबीआय बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड हा गुंतवणुकीचासाठी चांगला पर्याय आहे.
छोटी सुरुवात, मोठी स्वप्न
स्टेट बँक ऑफ म्युच्युअल फंड द्वारे गुंतणूकदारांना किमान 250 रुपयांपासून एसआयपी करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यामुळं म्युच्युअल फंडपासून लांब असणारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडसोबत जोडले जातील. एसआयपीद्वारे शेअर बाजारात म्युच्युअल फंड मार्फत येणारी गुंतवणूक देखील वाढेल, असा प्रयत्न आहे.
नव्या गुंतवणूकदारांना जननिवेश योजना फायदेशीर ठरणार आहे. शेअर बाजारात चढ उतार होत असतात, अशा कालावधीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक डोळ्यासमोर ठेवत गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.
जननिवेश एसआयपी कशी सुरु करायची?
स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडमध्ये जननिवेश एसआयपी सुरु करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो अॅपमधून गुंतवणक करता येईल. याशिवाय पेटीएममधून देखील ही एसआयपी सुरु करता येईल. ग्रो आणि झिरोधा प्लॅटफॉर्मवरुन देखील गुंतवणुकीचा प्रवास सुरु करता येईल.
जननिवेश एसआयपीत गुंतवणुकीचे तीन पर्याय
जननिवेश एसआयपीमध्ये गुंतवणुकीचे तीन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एखादा गुंतवणूकदार दररोज एसआयपीद्वारे 250 रुपयांपासून रक्कम गुंतवू शकतो. याशिवाय साप्ताहिक आणि दरमहा पद्धतीनं देखील गुंतवणक करता येईल. एसआयपीद्वारे दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते. एसआयपीमधील दीर्घकालीन गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते.
इतर बातम्या :
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

