Weight Loss: ना कोणता व्यायाम..ना कोणतं डाएट..3 आठवड्यांत वजन केलं कमी? आर. माधवनने सांगितलं 'वेट लॉस सीक्रेट! एकदा जाणून घ्याच..
Weight Loss: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आर. माधवनने त्याच्या फिटनेसचे रहस्य चाहत्यांसोबत शेअर केलंय. या टिप्स अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांना कोणतीही मेहनत, डाएटिंग न करता वजन कमी करायचे आहे.

Weight Loss: आजकाल जीवनशैलीतील बदल, कामाचा ताण, खाण्याच्या अयोग्य वेळा यासारख्या अनेक गोष्टींमुळे लोकांना लठ्ठपणा सारख्या गंभीर आजाराने ग्रासलंय. ते म्हणतात ना, वजन वाढवणं जितकं सोपं असतं तितकचं कठीण वजन कमी करणं असतं. काही लोक व्यायाम करण्यात खूप आळशी असतात. जर तुम्हालाही कोणत्याही कठोर परिश्रमाशिवाय वजन कमी करायचंय तर बॉलीवूड अभिनेता आर. माधवनने नुकतेच त्याच्या फिटनेसबाबत एक मजेशीर सीक्रेट सांगितले आहे. त्याने एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीने 21 दिवस योग्य आणि संतुलित दिनचर्या फॉलो केली, तर तुम्हाला खूप फरक दिसू शकतो. जाणून घेऊया त्याच्या फिटनेसचे रहस्य.
अभिनेत्याचे हे रहस्य अनेकांना माहीत नाही..
आर माधवनने त्याचे वजन कसे कमी केले आणि फिट राहण्यासाठी त्याने 21 दिवस काय केले हे सांगितले. Intermittent Fasting च्या मदतीने अभिनेत्याने वजन कमी केल्याचं तो सांगतो. यासाठी त्याने कोणतेही वर्कआऊट केलेलेली नाही. या अभिनेत्याने 3 आठवडे दररोज योग्य डाएट आणि योग्य वेळी खाण्याच्या योजनेचे पालन केले.
फॅट टू फिट असणे सोपे की कठीण?
अभिनेत्याने म्हटले आहे की, तो शेवटचे जेवण संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी खातो. त्यांचे अन्न प्रथिने आणि चरबी मुक्त आहे. तो दररोज सकाळी चालतो आणि दिवसभरात पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ घेतो. यासोबतच तो त्याची झोपही पूर्ण करतो. वजन नियंत्रणासाठी 7-8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपूर्वी तो काहीही खात नाही. यानुसार तुमचा उपवास 15 ते 16 तासांचा असतो. तसेच, अभिनेता सांगतो की आपण आपले अन्न व्यवस्थित चावून खाल्ले पाहिजे.
View this post on Instagram
Intermittent Fasting करण्याचे फायदे
- अशा प्रकारच्या उपवासामुळे वजन कमी होते.
- अधूनमधून उपवास केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
- हृदयाचे आरोग्य सुधारते.
- मानसिक आरोग्याला चालना मिळते.
- तुम्ही उर्जेने परिपूर्ण राहाल.
हेही वाचा>>>
Weight Loss: जपानी लोक इतके स्लिम आणि फिट का असतात? फिटनेसचं सीक्रेट जाणून तुम्हालाही बसेल धक्का! एकदा पाहाच..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
