News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

Video : न्यायमूर्तींच्या बंगल्यातील स्टोअर रुममध्ये पाचशेच्या नोटांच्या पोत्यांची थप्पी जळत असताना 65 सेकंदाचा अनकट Video; अग्नीशमन कर्मचारी म्हणाला, महात्मा गांधींमध्ये आग लागली!

Yashwant Varma : नोटा जळताना पाहून अग्नीशमन दलाचा कर्मचारी महात्मा गांधी जळत आहेत अशी प्रतिक्रिया दिली. व्हिडिओत त्याची प्रतिक्रिया सुद्धा रेकाॅर्ड झाली आहे.

FOLLOW US: 
Share:
Yashwant Varma : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून 15 कोटी रुपयांची रोकड सापडल्याचा व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयाने जारी केला आहे.  65 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये चलनी नोटांनी भरलेल्या पोतीच्या पोती जळताना दिसूत येत आहेत. ही घटना 14 मार्चची आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल बंगल्यावर पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांना या नोटा सापडल्या. ही रक्कम सुमारे 15 कोटी रुपये होती, असे बोलले जात आहे. नोटा जळताना पाहून अग्नीशमन दलाचा कर्मचारी महात्मा गांधी जळत आहेत अशी प्रतिक्रिया दिली. व्हिडिओत त्याची प्रतिक्रिया सुद्धा रेकाॅर्ड झाली आहे.

मोबाईल तपासण्याचे आदेशही देण्यात आले

दरम्यान, या प्रकरणी सरन्यायाधीशांनी तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली असून न्यायमूर्ती वर्मा यांना कोणतेही काम न देण्यास सांगितले आहे. त्यांचा मोबाईल तपासण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणात न्यायमूर्ती वर्मा यांनी म्हटले आहे की, घटनेच्या वेळी ते घरात उपस्थित नव्हते आणि त्यांना गोवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निर्देशानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचे 1 सप्टेंबर 2024 ते 22 मार्च 2025 पर्यंतचे कॉल रेकॉर्ड आणि IPDR (इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड) मागितले आहेत. न्यायमूर्ती वर्मा प्रकरणाचा तपास सर्वसमावेशक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने हालचाल सुरु केली आहे. 
 
न्यायमूर्ती वर्मा प्रकरणाचा अहवाल 21 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना सादर केल्यानंतर, CJI संजीव खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला पत्र लिहून न्यायमूर्ती वर्मा यांच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड आणि मोबाइल सेवा प्रदात्यांच्या इतर मोबाइल नंबरचे तपशील मागवण्यास सांगितले. यासोबतच न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी गेल्या सहा महिन्यांत नियुक्त केलेले रजिस्ट्री कर्मचारी, खासगी सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची माहिती गोळा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कॉल रेकॉर्ड आणि आयपीडीआर म्हणजे काय?

कॉल रेकॉर्ड आणि आयपीडीआर एखाद्या व्यक्तीच्या डिजिटल हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. कॉल रेकॉर्ड्स दाखवतात की एखादी व्यक्ती कधी, कोणाशी आणि किती वेळ बोलली. त्याचवेळी आयपीडीआरच्या माध्यमातून मोबाईल फोनवरून कोणत्या वेबसाइट्स आणि ॲप्लिकेशन्सचा वापर करण्यात आला, याची माहिती मिळते. इंटरनेट किती आणि केव्हा वापरले आणि कोणतेही VPN वापरले होते का याची माहिती मिळते. जरी आयपीडीआरमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड डेटा नसला तरी, गुगल किंवा व्हॉट्सॲप वापरला गेला हे कळू शकते, परंतु तेथे काय शोधले गेले किंवा चॅट केले गेले हे कळू शकत नाही. आयपीडीआर रेकॉर्डच्या आधारे तपास यंत्रणा हे शोधू शकतात की न्यायमूर्ती वर्मा यांनी गेल्या सहा महिन्यांत कोणत्या वेबसाइट्स आणि ऑनलाईन सेवांचा वापर केला. याशिवाय त्यांचा कोणत्याही संशयास्पद क्रमांकावर संपर्क होता का, हेही तपासता येईल.
 
Published at : 23 Mar 2025 01:30 PM (IST) Tags: delhi high court SUPREME COURT Yashwant Varma

आणखी महत्वाच्या बातम्या

Goa Nightclub Fire : गोवा नाईटक्लब आग, 25 जणांच्या मृत्यूप्रकरणी मॅनेजरसह चार जणांना अटक, क्लबचा मालक फरार

Goa Nightclub Fire : गोवा नाईटक्लब आग, 25 जणांच्या मृत्यूप्रकरणी मॅनेजरसह चार जणांना अटक, क्लबचा मालक फरार

IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स

IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स

आज इंडिगोच्या 1 हजार 650 फ्लाईट्सचं उड्डाण होणार, जवळपास 650 फ्लाईट्स आणखी रद्दच , सेवा पूर्वपदावर करण्याचे प्रयत्न सुरु

आज इंडिगोच्या 1 हजार 650 फ्लाईट्सचं उड्डाण होणार, जवळपास 650 फ्लाईट्स आणखी रद्दच , सेवा पूर्वपदावर करण्याचे प्रयत्न सुरु

Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...

Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...

Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर

Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर

टॉप न्यूज़

Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर

Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर

सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?

Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?