बीएमआय कॅल्क्युलेटर
तुमचा बॉडी मास इंडेक्स मोजा
बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) बॉडी फॅट मोजण्याचं कॅल्क्युलेटर आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या उंची आणि वजनाच्या आधारावर मोजलं जातं. आपलं बीएमआय जाणून घेण्यासाठी वजन आणि उंची या कॅल्क्युलेटरमध्ये एन्टर करा, यानंतर तुमचा बीएमआय समोर येईल.
FAQ
बीएमआय (Body Mass Index) योग्य आहे की नाही? बीएमआय कॅल्क्युलेटरचा वापर कुठे होतो?
एका तंदुरुस्त व्यक्तीचं वजन त्याच्या उंचीच्या प्रमाणात असायला हवं आणि यासाठी परिमाण निश्चित केलेले आहेत. तुमच्या उंची आणि वजनाच्या गुणोत्तरालाच बीएमआय किंवा बॉडी मास इंडेक्स म्हटलं जातं. हे मोजण्यासाठी विविध कॅल्क्युलेटर असतात. हे कोणत्या फॉर्म्युल्यावर काम करतं आणि त्याचा वापर कुठे केला जातो, ते जाणून घेऊया
बॉडी मास इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे?
बीएमआय मोजण्यासाठी एक सामान्य फॉर्म्युला असतो. यासाठी व्यक्तीला आपल्या वजन आणि उंचीचा योग्य आकडा एन्टर करावा लागतो. यानंतर
बीएमआय = वजन/ (उंची X उंची) किंवा बीएमआई = वजन/ (लांबी चौरस)
बीएमआयचं परिमाण काय?
एखाद्या व्यक्तीचा उंची आणि वजनाच्या आधारावरील बीएमआय इंडेक्स 18.5 पेक्षा कमी आला तर तो सामान्यपेक्षा कमी असतो. जर तुमचा बीएमआय स्तर 18.5 पासून 24.9 दरम्यान असेल तर तो योग्य आहे. मात्र बीएमआय स्तर जर 25 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर काळजीचं कारण आहे. अशा व्यक्तींना हृदयाचे आजार, स्ट्रोक, मधुमेह होण्याची भीती असते. 30 पेक्षा जास्त बीएमआय असल्यास लठ्ठपणाशी संबंधित सर्व आजार तुम्हाला होऊ शकतात.
बीएमआय कॅल्क्युलेटरचा वापर कोणासाठी अयोग्य?
एक बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे बीएमआयचा वापर गर्भवती, किंवा वृद्ध तसंच लहान मुलांसाठी करु नये. सोबतच बॉडी बिल्डर्स आणि अॅथलीट्स यांच्यासाठीही बीएमआयचा वापर करता कामा नये. याचं सर्वात मोठं कारण असं की, या व्यक्तींचं योग्य मोजमाप करण्यास बीएमआय सक्षम नाही. असंही म्हटलं जातं की, स्नायू किंवा चरबी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे बीएमआय समजू शकत नाही. उदाहरणार्थ समजा की गर्भवतींच्या वजनात केवळ त्यांचंच नाही तर गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या वजनाचाही समावेश असतो.
जर तुमचं बीएमआय इंडेक्स तुमच्या उंची आणि वजनाच्या आधारे 18.5 पेक्षा कमी येत असेल. तर हे वजन सामान्यपेक्षा कमी आहे आणि ते वाढवण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीची बीएमआय इंडेक्स 18.5 ते 24.9 मध्ये असणं गरजेचं असतं. ज्या व्यक्तींचं बीएमआय इंडेक्स यादरम्यान येतं त्यांनी ते मेन्टेन करण्याची गरज असते. 25 किंवा त्याहून अधिक बीएमआय आल्यानंतर अलर्ट होण्याची गरज असते. कारण या बीएमआय लेव्हल असणाऱ्यांना डायबिटीज टाईप 5, हार्ट डिजीज किंवा स्ट्रोक होण्याचा धोका असतो. तसेच दर 30 पेक्षा जास्त बीएमआय इंडेक्स असल्यास लठ्ठपणा किंवा लठ्ठपणामुळे जडणारे इतर आजार होण्याचा धोका वाढतो.
बीएमआय इंडेक्सचं लिमिट काय आहे?
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, निरोगी शरीर आणि नियंत्रणात असलेलं वजन फक्त याचाच संबंध बीएमआय इंडेक्सशी नसतो. तर वय आणि लिंग यामुळेही बीएमआय म्हणजेच, बॉडी मास इंडेक्सवर परिणाम होतो. शरीराची उंची आणि वजनाचं गुणोत्तर म्हणजे बीएमआय. बीएमआयमुळे शरीराचं वजन तुमच्या उंचीच्या तुलनेत योग्य आहे की, नाही, याबाबत जाणून घेणं शक्य होतं. परंतु, यामध्येही काही मर्यादा आहेत. तुमच्या शरीरामध्ये फॅट्स किती आहेत, याची माहिती बीएमआयमार्फत मिळू शकत नाही.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बीएमआय निरोगी शरीराच्या वजनाचा एक इंडिकेटर नक्कीच आहे. परंतु, याच्याही काही मर्यादा आहेत. बीएमआय एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील खरे प्रमाण किंवा रचना यांची योग्य माहिती देऊ शकत नाही. स्नायू, शरीरातील हाडांचे वजन आणि चरबी यामुळे प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते. त्यामुळे फक्त उंची आणि वजन यावरुन शरीराचं आरोग्य उत्तम आहे की, नाही हे ठरवणं योग्य नाही.
बीएमआयच्या मर्यादा प्रौढ व्यक्तींसाठी वेगळ्या का आहेत?
बीएमआय पूर्णपणे अचूक असू शकत नाही, हे आम्ही तुम्हाला आधीही सांगितलं आहे. बीएमआयमुळे आपल्या शरीराचं वजन किती प्रमाणात जास्त आहे, हे समजण्यास मदत होते. मात्र यामुळे शरीरातील जास्त चरबीबाबत समजत नाही. वेगवेगळ्या वयोगट, लिंग, स्नायू आणि शरीरातील चरबी यांसारखे फॅक्टर्समुळे बीएमआयवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं.
यासंदर्भात एक उदाहरण द्यायचं झालं तर, एक प्रौढ व्यक्ती जी बीएमआयच्या परिमाणानुसार, योग्य वजनाची आहे, परंतु, ती आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यायाम करत नसेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात फॅट्स जमा होण्याची शक्यता असते. अशातच जरी त्या व्यक्तीच्या शरीराचं वजन वाढलेलं नसेल आणि बीएमआय लेव्हलच्या आधारावर ती आदर्श स्थितीत असेल, तरीही ती निरोगी समजली जाऊ शकत नाही. त्याच बीएमआयचा जास्त स्नायूंची रचना असलेला एक तरुण व्यक्ती निरोगी समजला जाईल. अशाप्रकारे प्रौढ व्यक्तींसाएजठी बॉडी मास इंडेक्स म्हणजेच, बीएमआयसाठी वेगळ्या प्रकारच्या मर्यादा आहेत.
टॉप न्यूज़
Maharashtra Corona Update | राज्यात आज 8744 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 9068 जण कोरोनामुक्त
JEE Main 2021 Result Released: जेईईचा फेब्रुवारी सेशनचा निकाल जाहीर, असा पहा निकाल
Breaking News LIVE : टेस्टिंगला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊलं उचलावी लागतील; कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांचा इशारा
IPL 2021 | विराट कोहलीच्या नेतृत्त्वात RCB विजयी होणार? पाहा सीझनचं संपूर्ण शेड्यूल
दहावी, बारावी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी 61 टक्के विद्यार्थ्यांची पसंती : विद्यार्थी, पालकांचं सर्वेक्षण
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनं घेतला प्रेक्षकांचा निरोप; 'गॅरी'च्या Reel आणि Real Life पत्नीनं लिहील्या भावनिक पोस्ट
Saina Nehwalच्या भूमिकेत दिसणार Parineeti Chopra; बायोपिकचा ट्रेलर रिलीज
पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा होणाऱ्या जावायाला सल्ला, उत्तर काय मिळाले वाचा..