एकनाथ शिंदेंच्या वाढदिनी राज्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा; मंगेश चिवटेंकडे जबाबदारी
शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मंगेश चिवटे यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी हा कक्ष संलग्न असणार आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जैस्वाल साहेब उपस्थित होते.
शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांच्या माध्यमातून राज्यात गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला यश आले होते. या कक्षातून तब्बल 419 कोटी निधी वितरित केला गेला. ज्यामुळे 51 हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. शिंदे उपमुख्यमंत्री होताच आता पुन्हा एकदा मंगेश चिवटे यांच्याकडे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत काल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली. या कक्षाच्या अधिकृत लोगोचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले. या कक्षाची जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्याचा… pic.twitter.com/RsVzhvGSwF
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 10, 2025
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत काल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली. या कक्षाच्या अधिकृत लोगोचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले. या कक्षाची जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग व महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी हा कक्ष संलग्न असणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अडीच वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची अखंडपणे सेवा करण्यात आली. या कक्षामधून सुमारे 419 कोटी अर्थसहाय्य वितरित करण्यात आले ज्यामुळे 51 हजार पेक्षा अधिक दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली. त्यांच्या आयुष्यात निरामय आरोग्याचा प्रकाश आला. गेल्या 8 वर्षांपूर्वी आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करून आरोग्याच्या महायज्ञाला सुरुवात केली. रुग्ण सेवेचा हाच वसा आणि परंपरा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आम्ही पुढे घेऊन जात आहोत. यासाठी निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्या सर्व रूग्णसेवकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
