Weight Loss: जपानी लोक इतके स्लिम आणि फिट का असतात? फिटनेसचं सीक्रेट जाणून तुम्हालाही बसेल धक्का! एकदा पाहाच..
Weight Loss: संपूर्ण जगात जपान देशात लठ्ठपणाची पातळी सर्वात कमी आहे, तेथील लोक बहुतेक स्लिम आणि फिट असतात. त्यांच्या फिटनेस रहस्य काय आहे? जाणून घ्या.

Weight Loss: आपण अनेकदा पाहतो, भारताशिवाय इतरही देशात लठ्ठ लोक अढळतात. मोठ्या प्रमाणात जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली यामुळे अनेक लोक लठ्ठपणाने सध्या त्रस्त आहेत. मात्र जपान असा एक देश आहे, जिथे सर्वात कमी लठ्ठ लोक आढळतात, याचे कारण तिथले अनोखे खाद्यपदार्थ आणि जीवनशैली... जपानी लोकांची वजन कमी करण्याची पद्धत काय आहे? एका यूट्यूबरने त्याच्या पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत...
जपानी लोकांचे वजन नियंत्रणात कसे राहते?
जपानी लोकांचा आहार संतुलित आणि पोषक असतो. त्यामुळे त्यांचे वजनही नियंत्रणात राहते. जपानी लोक जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खात नाहीत आणि ताजे अन्न खातात. तिथले लोक त्यांच्या दैनंदिन सवयींमध्ये काही चांगल्या सवयी फॉलो करतात, ज्यामुळे त्यांचे मेटाबॉलिज्म मजबूत होते.
जपानी वजन कमी करण्याच्या टिप्स
हरा हाचि बु ट्रिक काय आहे?
या ट्रिकमध्ये, तुम्हाला तुमचे पोट 80% पर्यंत भरावे लागेल, म्हणजेच एकाच वेळी पोटापेक्षा थोडे कमी खा. या अन्नामध्ये भरपूर फायबर आणि कमी कॅलरीज असणे आवश्यक आहे. या खाण्याच्या पद्धतीमुळे मन शांत राहते आणि तुम्ही कमी अन्न खाता. यामुळे वजन कमी करताना तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवणार नाही.
टी-टाइम ट्रेडिशन
या पारंपारिक सूत्रानुसार, तुम्हाला नैसर्गिकरित्या तयार केलेला ग्रीन टी प्यावा लागेल. हर्बल आणि खरा ग्रीन मॅचा चहा हा बाजारात उपलब्ध असलेल्या ग्रीन टी बॅगपेक्षा वेगळा आणि अधिक प्रभावी आहे. या ग्रीन टीमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करणारे गुणधर्म आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच हा ग्रीन टी प्यायल्याने त्यांचे पोट जास्त काळ भरलेले राहते.
स्मॉल पोर्शन
जपानी लोक त्यांचे अन्न लहान भागांमध्ये खातात, लहान ताट आणि वाट्या वापरतात. ते लहान ताटात थोडेसे अन्न घेतात आणि ते अन्न व्यवस्थित चावून खातात. जर लोकांनी अशा प्रकारे खाल्ले तर ते जास्त खाणे टाळतात आणि योग्य चघळण्याच्या मदतीने त्यांना अन्नातून पूर्ण पोषण देखील मिळते.
या गोष्टींचाही समावेश
याशिवाय जपानचे लोक त्यांच्या आहारात हायड्रेशनला महत्त्व देतात. तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि तुमच्या जीवनशैलीत शारीरिक हालचालींचा समावेश करावा. तुम्ही तुमच्या आहारात सीफूड आणि आंबवलेले पदार्थ खाऊ शकता. सीफूडमध्ये माशांचा समावेश करा, जे फॅटी ऍसिड आणि ओमेगा -3 चे स्त्रोत आहे.
हेही वाचा>>>
Fitness: PM मोदी यांच्या फिटनेसचं 'हे' रहस्य! फार कमी लोकांना माहीत, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

