एक्स्प्लोर

भारतीय पान मसाला कंपनीकडून फसवणूक : पियर्स ब्रॉसनन

दिल्ली सरकारने जेम्स बाँड फेम हॉलिवूड अभिनेते पियर्स ब्रॉसनन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

नवी दिल्ली : जेम्स बाँड फेम हॉलिवूड अभिनेते पियर्स ब्रॉसनन यांनी भारतीय ब्रँडच्या पान मसाला कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. पान मसाला आरोग्यासाठी घातक ठरु शकतो, हे कंपनीने सांगितलं नव्हतं, असा दावा ब्रॉसनन यांनी केला. पियर्स ब्रॉसनन पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. दिल्ली सरकारने पियर्स ब्रॉसनन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ब्रॉसनन यांनी दिल्ली राज्य तंबाखू नियंत्रण विभागाला उत्तर दिलं आहे. 'पान मसाला कंपनीने माझी फसवणूक केली. कंपनीने आपल्या उत्पादनामुळे होणारं नुकसान आणि जाहिरातीच्या करारातील इतर नियम आणि अटींबाबत खुलासा केला नव्हता' असं ब्रॉसनन यांनी म्हटल्याचं आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक एसके अरोरा यांनी सांगितलं. 'पान बहार'कडून दिशाभूल, 'जेम्स बाँड' पियर्स ब्रॉसनन नाराज 'कंपनीसोबत आपला करार पूर्ण झाला आहे. अशा अभियानांविरोधात कुठलीही मदत आणि समर्थन देण्याची तयारी ब्रॉसनन यांनी दर्शवली' असंही अरोरा म्हणाले. पियर्स ब्रॉसनन यांनी 1995 ते 2002 या काळात बाँड सीरिजमधले चार चित्रपट केले होते. एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. मात्र पान तंबाखूची जाहिरात स्वीकारल्यामुळे भारतात आपली प्रतिमा नकारात्मक झाल्याचं, त्यांनी म्हटलं होतं. पान मसाला कंपनीचे संचालक आणि अधिकाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई का करु नये, अशी विचारणाही सरकारने पान मसाला कंपनीला केली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व नामांकित व्यक्ती (सेलिब्रेटी) आणि मास मीडिया एजन्सींकडे पान मसाला, चहा, वेलची आणि अन्य पदार्थांच्या नावाखाली तंबाखूच्या सरोगेट जाहिरातींमध्ये सहभागी न होण्याचं आवाहन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस; घाटकोपरमध्ये ट्रॅफिक जॅम तर ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प
मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस; घाटकोपरमध्ये ट्रॅफिक जॅम तर ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP MajhaMumbai Rain : उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ठाणे,बदलापूर ,कल्याणमध्ये पावसाची बॅटिंगABP Majha Headlines : 04 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस; घाटकोपरमध्ये ट्रॅफिक जॅम तर ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प
मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस; घाटकोपरमध्ये ट्रॅफिक जॅम तर ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Embed widget