Reliance Retail : रिलायन्सचे कर्मचारी मालामाल, मुकेश अंबानींनी वाटले 351 कोटी रुपये
उद्योगपती मुकेश अंबानींची (mukesh ambani) रिटेल कंपनी रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिलीय. रिलायन्स रिटेलने आपल्या कर्मचाऱ्यांना 351 कोटी रुपयांचे शेअर्स दिले आहेत.
Reliance Retail Share : उद्योगपती मुकेश अंबानींची (mukesh ambani) रिटेल कंपनी रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) कर्मचाऱ्यांना (Employees) एक मोठी भेट दिली आहे. रिलायन्स रिटेलने आपल्या 15 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना 351 कोटी रुपयांचे शेअर्स दिले आहेत. कर्मचारी स्टॉक ऑप्शन प्लॅन अंतर्गत ह शेअर्स वितरित केले आहेत. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण मिटींग आज होणार आहे. त्यापूर्वीच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
रिलायन्स रिटेलचा आयपीओ येत्या दोन वर्षांत लॉन्च होण्याची शक्यता
रिलायन्स रिटेलने रजिस्ट्रार ऑफ कंपनीला दिलेल्या फाइलिंगमध्ये ESOP अंतर्गत उच्च कर्मचाऱ्यांना दिलेल्या समभागांची माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 796.5 रुपये प्रति शेअर दराने विभागले गेले आहेत. कंपनीचे एकूण 4.417 दशलक्ष शेअर्स लाभार्थी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. कंपनीने म्हटले आहे की जेव्हाही त्यांचा IPO येईल तेव्हा बोर्ड ESOP अंतर्गत वितरित समभागांची यादी करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल. दरम्यान, आज होणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये रिलायन्स रिटेलच्या आयपीओचा खुलासा केला जाऊ शकतो, असे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. रिलायन्स रिटेलचा आयपीओ येत्या दोन वर्षांत लॉन्च होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
'या' अधिकाऱ्यांचा समावेश
ESOP मध्ये करोडो रुपयांचे शेअर्स वितरित करण्यात आले आहेत. रिलायन्स रिटेलच्या ज्या कर्मचाऱ्यांना ESOP अंतर्गत शेअर्स वितरित करण्यात आले आहेत, त्यामध्ये, संचालक व्ही सुब्रमण्यम, किराणा रिटेल दामोदर मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, फॅशन आणि जीवनशैली व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अखिलेश प्रसाद, इलेक्ट्रॉनिक्स रिटेलचे मुख्य व्यवसाय अधिकारी कौशल नेवरेकर यांचा समावेश आहे. तसेच अश्विन खसगीवाला आणि अजिओचे मुख्य कार्यकारी विनीत नायर यांचा समावेश आहे. तसेच रिलायन्स रिटेलने कामदेव मोहंती, मुख्य कार्यकारी अधिकारी, किराणा रिटेल आणि जिओमार्ट, प्रतिक माथूर, स्ट्रॅटेजी आणि प्रोजेक्ट हेड, रिलायन्स ट्रेंडचे मुख्य परिचालन अधिकारी विपिन त्यागी आणि केतन मोदी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ESOP अंतर्गत शेअर्सचे वाटप केले आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण मिटींग आज होणार आहे. या सभेपूर्वीच मुकेश अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: