Shani Transit 2025: अवघे काही तास शिल्लक, आजची रात्र 'या' 3 राशींचे आयुष्य बदलणारी! शनिचं मोठं संक्रमण होणार, पैसाच पैसा असेल हातात
Shani Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्चच्या रात्रीपासून 3 राशीच्या भाग्याचे तारे चमकणार आहेत. शनीच्या मीन राशीत प्रवेश केल्यामुळे कोणत्या राशींचे जीवन बदलू शकते? जाणून घेऊया.

Shani Transit 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 29 मार्च 2025 तारीख आहे. आजचा दिवस हा अनेक राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कर्माचे फळ देणारी देवता म्हणून शनिदेवांना मानले जाते. 29 तारखेच्या रात्री शनिचं मीन राशीत संक्रमण होणार आहे. ज्यामुळे अनेकांचे नशीब पालटू शकते. यासोबतच आज शनि अमावस्या, सूर्यग्रहणही असल्याने ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार आजच्या दिवसाचे महत्त्व अत्यंत वाढले आहे. 29 मार्चच्या रात्रीपासून 3 राशीच्या भाग्याचे तारे चमकणार आहेत. शनीच्या मीन राशीत प्रवेश केल्यामुळे कोणत्या राशींचे जीवन बदलू शकते? जाणून घेऊया.
सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव...
ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रह हा सर्वात कमी वेगाने राशी बदलण्यासाठी ओळखला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी या ग्रहाला सुमारे अडीच वर्षे लागतात. त्याच राशीत पुन्हा संक्रमण होण्यास सुमारे 30 वर्षे लागतात. 29 मार्च रोजी कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करेल. 29 मार्च रोजी शनि संक्रमण हे शनिवारी रात्री 9.44 वाजता मीन राशीत होणार आहे. अशा स्थितीत सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहे. ज्यामुळे अनेकांच्या जीवनात मोठे बदल दिसून येतात..
आजची रात्र महत्त्वाची, 3 राशींचे जीवन बदलू शकते
वैदिक पंचांगानुसार, शनिवार 29 मार्च रोजी रात्री 11:01 वाजता शनी मीन राशीत संक्रमण करेल. यानंतर 3 राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया शनीच्या मीन राशीत प्रवेश केल्यामुळे कोणत्या 3 राशींचे जीवन बदलू शकते?
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण लाभदायक राहील. जीवनात सकारात्मक बदल होतील. घरामध्ये शुभ घटना घडू शकतात. नातेवाईकांच्या भेटी होऊ शकतात. करिअरमध्ये यश मिळू शकते. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. पदोन्नती किंवा उत्पन्न वाढण्याची चर्चा होऊ शकते.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण लाभदायक राहील. मीन राशीत शनीच्या संक्रमणाने मकर राशीत सुरू असलेली साडेसाती संपेल. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. आर्थिक स्थिती सुधारू शकते. परस्पर मतभेद दूर होतील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारू शकतात.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण शुभ परिणाम देईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. नोकरीत बढती मिळू शकेल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते. करिअरमध्ये यश संपादन करू शकाल.
हेही वाचा>>
April 2025 Monthly Horoscope: एप्रिल महिना 'या' राशींसाठी ठरणार गेमचेंजर! आयुष्यात होणार मोठा बदल, मासिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















