एक्स्प्लोर

Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!

Namo Shetkari : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून जमा करण्यात येणार आहेत.

मुंबई : 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या सहाव्या हप्त्यांतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत ₹2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी 'नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्यात सन 2023-24 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पी. एम. किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 6 हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6 हजार रुपयांची भर घालत आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12 हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य हस्ते दि. 26 ऑक्टोबर, 2023 रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे.आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण 5 हप्ते वितरीत करण्यात आलेले असून राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना रू. 8961.31 कोटीचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माहे डिसेंबर, 2024 ते माहे मार्च, 2025 या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या हप्ता वित्तरण सोहळयामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रू. 1967.12 कोटी निधीचा लाभ वितरीत करण्यात आलेला आहे. या व्यतिरीक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी.एम. किसान योजनेअंतर्गत एकूण 65047 लाभार्थीना लाभ अदायगीचे नियोजन केले आहे. त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू.2169 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचं देखील म्हटलं आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!

व्हिडीओ

Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
Devendra Fadnavis: फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
Embed widget