एक्स्प्लोर

खिशात पैसे घेऊन राहा तयार! मुकेश अंबानी घेऊन येणार रेकॉर्डब्रेक IPO, खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी

सध्या शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळतेय. असे असताना आता रिलायन्यस उद्योग समूह एक मोठा आयपीओ घेऊन घेण्याची शक्यता आहे.

मुंबई : सध्या रोजच नवनव्या कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. आयपीओनंतर शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्याचा अनेक कंपन्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, देशातील जगप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी लवकरच रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे. तशी तयारी केली जात असल्याचा दावा केला जातोय. जिओ इन्फोकॉमचा आयपीओ येणार असेल तर आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आयपीओ असेल, असे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे सध्या शेअर बाजारा तेजीत असताना मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही टेलिकॉम कंपनी आपला आयपीओ घेऊन येऊ शकते. एकूण 55 हजार कोटी रुपयांचा हा आयपीओ असेल, असे सांगितले जात आहे. 

पेटीएमचा रेकॉर्ड तोडून एलआयसी बनली नंबर वन 

सध्या सर्वांत मोठ्या आयपीओचा रेकॉर्ड हा एलआयसीच्या नावावर आहे. ही एक सरकारी विमा कंपनी आहे. मे 2022 मध्ये या कंपनीने आपला विमा आणला होता. या आयपीओचा आकार तेव्हा 21 हजार कोटी रुपये होता. याआधी पेटीएमची पॅरेन्ट कंपनी वन97 कम्युनिकेशन्सचा आयपीओ हा सर्वांत मोठा होता. नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने आपला 18,300 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. 

ह्युंदाई कंपनीचाही येणार आयपीओ 

गेल्या दोन वर्षांपासून एलआयसीच्या आयपीओचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेला नाही. रिलायन्स जिओचा आयपीओ आल्यावर हा रेकॉर्ड तुटू शकतो. दुसरीकडे वाहनिर्मिती क्षेत्रातील दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई या कंपनीची ह्युंदाई इंडिया ही स्थानिक कंपनीही आयपीओ आणण्याची शक्यता आहे. त्यासाठी ह्युंदाई इंडियाने आईपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट फाईल केलेला आहे. आयपीओच्या ड्राफ्टनुसार ह्युंदाईचा आयपीओ 25 हजार कोटी रुपये असू शकतो. 

जिओचा आयपीओ किती मोठा असणार? 

रिलायन्स इंडस्ट्रिज उद्योग समुहाच्या वार्षिक बैठकीनंतर रिलायन्स जिओच्या आयपीओबद्दलचे नेमके चित्र स्पष्ट होईल. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात ही वार्षिक बैठक होणार आहे. हा आयपीओ साधारण 55,500 कोटी रुपये असू शकतो, असे सांगितले जात आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

ऑनलाईन पद्धतीने फॉर्म -16 कसा डाऊनलोड करायचा? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या!

मोठी बातमी! केंद्र सरकार 'नॅनो खता'साठी देणार 50 टक्के अनुदान, अमित शाहांकडून योजनेला सुरुवात

पैसे ठेवा तयार! लवकरच येणार 'या' दमदार कंपनीचा आयपीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद , उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Poharadevi Narendra Modi Welcome Prepration : पंतप्रधान वाशिम दौऱ्यावर; सभास्थळी जोरदार तयारीAmravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्जTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 5 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaPM Narendra Modi Thane Daura : पंतप्रधान मोदींच्यादौऱ्यासाठी ठाण्यात रस्त्याचं डीप क्लिनिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद , उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या
निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख
निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख
Ajit Pawar: प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
Embed widget