Kunal Kamra : मोठी बातमी, कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार, मद्रास हायकोर्टानं दिलासा देताच मोठा निर्णय
Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार आहे. सोमवारी 31 मार्चला तो मुंबई पोलिसांसमोर हजर राहील.

मुंबई : स्टँड कॉमेडियनं कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. कुणाल कामरा 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशी साठी उपस्थित राहील अशी माहिती आहे. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं अटकेपासून अंतरिम दिलासा दिल्यानंतर त्यानंतर त्यानं हा निर्णय घेतला आहे.
कुणाल कामरानं तामीळनाडूचा रहिवासी असल्याचा दावा करत मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ही याचिका सकाळी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी सुनावणी करण्यात आली. कुणाल कामराच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मद्रास हायकोर्टानं दिलासा दिला आहे. कुणाल कामराला अंतरिम दिलासा मद्रास हायकोर्टानं 7 एप्रिल पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम दिलासा कुणाल कामराला मिळाला आहे. मद्रास हायकोर्टानं कुाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, कारमाला मुंबईत येऊन इथल्या कोर्टातून रितसर जामीन मिळवणं गरजेचं आहे.
कुणाल कामरानं मद्रास हायकोर्टातून अंतरिम दिलासा मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाल कामरानं यूट्यूबवर नया भारत नावाचा व्हिडिओ अपलोड केला होता. त्यासोबतच त्यातील एक भाग महाराष्ट्र नावानं यूट्यूबसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेला. त्या गाण्यात कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव न घेता त्यानं टीका केली होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्या गाण्यावरुन संताप व्यक्त केला. कुणाल कामराचा व्हिडिओ जिथं शूट झाला त्या हॅबिटट स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. यानंतर मुंबई पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
कुणाल कामरावर देखील या प्रकरणी दोन गुन्हे मुंबईतील खार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहावे यासाठी दोन समन्स पाठवली होती होती. त्यानुसार कुणाल कामरानं मद्रास हायकोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं 7 एप्रिल पर्यंत अटक करण्यात येऊ नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळं कुणाल कामरा आता 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर उपस्थित राहील. 7 एप्रिल पर्यंत कुणाल कामराला मुंबईतील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवावा लागेल.
कुणाल कामरा याच्या विरोधात एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक आक्रमक झालेले दिसून आले होते. तर, कुणाल कामरानं व्हिडिओ अपलोड केल्यानंतर संविधानाचा फोटो पोस्ट करत जे काय होईल ते यानुसार होईल, असं म्हटलं होतं.























