एक्स्प्लोर

DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?

DA Hike News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला. महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील घोषणा पत्रकार परिषद घेत केली आहे. त्यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरुन 55 टक्क्यांवर पोहोचला आहे.  

केंद्र सरकार महागाई भत्ता वाढीसंदर्भात घोषणा केली आहे. याचा फायदा केंद्राचे कर्मचारी अन् पेन्शनर्स मिळून 1 कोटी लोकांना फायदा होणार आहे. महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवणं ही गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी वाढ ठरली आहे. 

सरकारकडून दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी महागाई भत्ता रिवाईज केला जातो. त्यानंतर याची घोषणा केली जाते. अपेक्षेप्रमाणं महागाई भत्ता 2 टक्के वाढला आहे. सध्या महागाई भत्ता 53 टक्के असून वाढून 55 टक्के झाला आहे.

कर्मचारी संघटनांकडून डीए 3 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी  करण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारनं डीए केवळ 2 टक्क्यांनी वाढवला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळं तो 50 टक्क्यांवरुन 53 टक्क्यांपर्यंत पोहोचला. 

महागाई भत्ता  2 टक्क्यांनी वाढला आहे. आता  ज्याचं मूळ वेतन 18000 जार असेल त्यांच्या पगारात 360 रुपयांची वाढ होईल.  55 टक्क्यांच्या हिशोबानं महागाई भत्ता 9900 रुपये मिळेल. जर तीन टक्के वाढ झाली तर 56 टक्क्यांच्या हिशोबानं महागाई भत्ता 10080 रुपये मिळाला असता. 

महागाई भत्ता ग्राहक मूल्य निर्देशांकांच्या (AICPI) च्या आधारावर निश्चित केला जातो. 2006 मध्ये सरकारनं महागाई भत्ता मोजण्यासाठी नवं पद्धत सुरु केली होती.

याशिवाय केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा देखील करत आहेत. केंद्रानं याबाबत  जानेवारी 2025 मध्ये घोषणा केलेली. तो जानेवारी 2026 पासून लागू होणं अपेक्षित आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारनं केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या महागाई भत्त्यात  आणि डीआरमध्ये 2 टक्के वाढ केली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. 

या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारच्या सेवेतील 48.66 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 66.55 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. यामुळं केंद्र सरकारवर वार्षिक 6614.04 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. डीए वाढवण्याचा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार करण्यात आला आहे.  दरम्यान, केंद्र सरकारनं महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केल्यानंतर देशातील राज्य सरकारं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणता निर्णय घेतात ते पाहावं लागेल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Embed widget