एक्स्प्लोर
KCC : किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या 5 लाख रुपयांसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? महत्त्वाचा नियम समोर, देशभरात KCC चे किती सदस्य?
Kisan Credit Card : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या रकमेची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाख करण्याची घोषणा केली होती.

किसान क्रेडिट कार्ड?
1/6

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा तीन लाखांवरुन पाच लाख रुपये करण्याची अर्थसंकल्पात केली. या घोषणेची जोरदार चर्चा झाली.
2/6

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा 3 लाखांवरुन पाच लाख करण्याची घोषणा केली असली. ज्या शेतकऱ्यांचं केसीसीच्या कर्ज परतफेडीचं रेकॉर्ड चांगलं आहे त्या शेतकऱ्यांना आणि जे नगदी पीकाची शेती करतात त्यांना मिळेल.
3/6

एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार 7.72 कोटी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. यापैकी ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाढीचा लाभ मिळेल, अशा शेतकऱ्यांची संख्या 80 लाख आहे.
4/6

यामुळं किसान क्रेडिट कार्डवरील अनुदानाचा बोजा 26000 हजार कोटी रुपये होईल. यामुळं बँकांवर अतिरिक्त भार देखील पडणार नाही.
5/6

वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी देशात किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या 7.7 कोटी इतकी आहे. मात्र, त्यापैकी 80 लाख सदस्यांना कर्जमर्यादा वाढीचा फायदा होईल. ही टक्केवारी 10.3 टक्के होते.ही माहिती त्यांनी बिझनेस स्टँडर्डशी बोलताना दिली होती.
6/6

किसान क्रेडिट कार्डची कर्ज पुरवठ्याची मर्यादा 5 लाख करण्यात आली आहे त्याचा लाभ ज्या शेतकऱ्यांचं कर्ज परतफेडीचं रेकॉर्ड चांगलं असेल त्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या वित्त पुरवठ्याची मर्यादा शेतकरी ज्या प्रमाणात परतफेड करेल तशी वाढवली जाते. किसान क्रेडिट कार्डद्वारे 9.81 लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे.
Published at : 05 Feb 2025 11:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भविष्य
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
