Surya Grahan : यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, 12 तासांचा सूतक काळ, वेध केव्हा लागणार? जाणून घ्या अचूक वेळ
Surya Grahan 2025 : 2025 या वर्षात पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी लागणार आहे. हे आंशिक सूर्य ग्रहण असणार आहे.

Surya Grahan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहण (Surya Grahan) ही एक अनोखी खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. यामुळे सूर्याचा पूर्ण भाग झाकला जातो. वैदिक पंचांगानुसार, 2025 या वर्षात पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी लागणार आहे. हे आंशिक सूर्य ग्रहण असणार आहे. हिंदू धर्ममान्यतेनुसार, ग्रहणाच्या काळात सूतक काळ लागतो. या सूतक काळात शुभ कार्य केलं जात नाही. पण, हे सूर्यग्रहण कधी लागणार? भारतात हे सूर्यग्रहण लागणार आहे का? तसेच, भारतातही सूतक काळ लागेल का? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
सूर्यग्रहणाची वेळ
वैदिक पंचांगानुसार, 2025 वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 29 मार्च रोजी लागणार आहे. या दिवशी चैत्र अमावस्या देखील आहे. भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण दुपारी 02 वाजून 20 मिनीटांनी सुरु होणार आहे आणि संध्याकाळी 06 वाजून 16 मिनीटांनी संपणार आहे.
भारतात सूर्यग्रहण दिसेल?
ज्योतिष शास्त्रानुसार, वर्षातील पहिलं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. कारण हे आंशिक सूर्यग्रहण आहे. त्यामुळे जेव्हा हे ग्रहण लागेल तेव्हा सूर्याचा जो हिस्सा ग्रहणाने प्रभावित असेल तो भारतात दिसणार नाही.
कुठे-कुठे दिसेल सूर्यग्रहण?
हे सूर्यग्रहण नॉर्थन क्यूबेक, कॅनडा, सायबेरिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये दिसणार आहे.
भारतात सूतक काळ लागेल?
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या 9 ते 12 तास आधीपासून सूतक काळ सुरु होतो. या दरम्यान पूजा-पाठ, आणि अन्न शिजवणं यांसारखी कामे न करण्याचा सल्ला दिला जातो. पण, हा सूतक काळ तेव्हाच मान्य असतो जेव्हा त्या त्या देशात सूर्यग्रहण दिसतं. मात्र, यंदाचं हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे याचा सूतक काळदेखील भारतात लागणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















