एक्स्प्लोर
Gold Rate Today : मुंबईत सोनं 87000 च्या पार, महिनाभरात तब्बल 8240 रुपयांनी सोनं महागलं,एका ग्रॅम साठी किती रुपये लागणार?
Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय राजकारणातील अस्थिरता, शेअर बाजारातील घसरण यामुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

सोन्याचा आजचा भाव
1/5

सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं 84 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एसीएक्सवर सोन्याचा दर 84252 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
2/5

रुपयाच्या तुलनेत डॉलरची घसरण, अमेरिका -चीन यांच्यातील व्यापार युद्धाची शक्यता, लग्नसराईच्या काळात देशातून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता यासारखी प्रमुख कारणं सोन्याच्या दरवाढी मागं आहेत.
3/5

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा एप्रिलच्या वायद्याचा दर 84252 रुपयांवर पोहोचला आहे. सर्राफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर काल 85800 रुपये होता. ही माहिती अखिल भारतीय सर्राफा संघानं दिली होती.
4/5

1 जानेवारीला 10 ग्रॅम सोन्याचा दर 79390 रुपये होता. म्हणजेच 4 जानेवारीपर्यंत 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 8240 रुपयांची वाढ झाली आहे. सलग पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मार्चच्या वायद्याच्या चांदीचा एक किलोचा दर 95826 रुपयांवर पोहोचला आहे.
5/5

देशाची राजधानी नवी दिल्ली आणि लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 86390 रुपये आहेत.चेन्नई, बंगळुरु,पुणे, हैदराबाद कोलकाता येथे सोन्याचा दर 86240 रुपये आहे. अहमदाबादमध्ये 86290 रुपयांना 24 कॅरेट सोनं मिळतं. सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत.मुंबईत सोन्याचा भाव 87 हजारांच्या पार गेला आहे. मागील 24 तासात एक हजारांहून अधिकची वाढ झाली आहे.मुंबईत सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्रॅम 87550 रुपयांवर आहे. मुंबईत सोन्याचा दर 8755 रुपये आहे.
Published at : 05 Feb 2025 12:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion