Kavya Maran Dating Rumors With Anirudh Ravichander: सनरायझर्सची सुंदर मालकीण काव्या मारन महागड्या भारतीय संगीतकाराला करतेय डेट? अफेअरच्या चर्चांना उधाण
Kavya Maran Dating Rumors With Anirudh Ravichander: काव्या मारनबाबत जाणून घेण्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. अशातच सध्या काव्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत चर्चा रंगल्या आहेत. काव्याचं नाव भारतातील सर्वात महागड्या संगीतकारासोबत जोडलं जात आहे.

Kavya Maran Dating Rumors With Anirudh Ravichander: आयपीएलमध्ये (IPL 2025) सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) सामन्यांदरम्यान, काव्या मारन (Kavya Maran) स्टेडियममध्ये अनेकदा टीच्या टीमला चिअर्स करताना दिसते. जेव्हा जेव्हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना असतो, त्या-त्या वेळी काव्या मारन अनेकदा स्क्रिनवर झळकते. सामन्या दरम्यानच्या तिच्या रिअॅक्शन्स तर कॅमेऱ्यातून सुटत नाहीच. अशातच नेहमीच आपल्या रिअॅक्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या काव्यानं सध्या एका वेगळ्याच विषयामुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काव्या सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.
काव्या मारनबाबत जाणून घेण्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. अशातच सध्या काव्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत चर्चा रंगल्या आहेत. काव्याचं नाव भारतातील सर्वात महागड्या संगीतकारासोबत जोडलं जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. काव्यासोबत नाव जोडलेला तो लकी संगीतकार कोण? अशी विचारणा नेटकऱ्यांकडूनही होत आहे. अशातच, काव्यासोबत नाव जोडलं गेलेला तो भारतातील सर्वात महागडा संगीतकार आहे, अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander).
मिडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या आणि अनिरुद्ध एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. पण, संगीतकार अनिरुद्ध रविचंदरच्या टीमनं अशा बातम्यांचं खंडन केलं आणि म्हटलं की, अनिरुद्ध आणि काव्या दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एवढंच काय तर, अनिरुद्धचं नाव अभिनेत्री कीर्ती सुरेशसोबतही जोडलं गेलं आहे. गेल्याच वर्षी 2024 मध्ये किर्ती आणि अनिरुद्ध लवकरच एकमेकांशी लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात होतं. पण, काही काळातच ही फक्त अफवा असल्याचं समोर आलं. त्यानंतर किर्तीनं तिचा प्रियकर अँटनी थाथिलशी लग्न केलं.
View this post on Instagram
लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आणि गायक अनिरुद्ध रविचंदर हे दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गाजलेलं नाव. अनिरुद्धनं अनेक तेलुगू आणि तमिळ चित्रपटांना संगीत दिलं आहे. तसेच, त्यानं शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटाचं संगीत खूप लोकप्रिय झालं. तेव्हापासूनच फक्त साऊथमध्ये नाहीतर, बॉलिवूडमध्येही अनिरुद्धच्या चर्चा रंगलेल्या असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























