एक्स्प्लोर

Agriculture News : हवामानातील बदलाचा शेती पिकांना फटका, उत्पादनात घट होणार; शेतकरी चिंतेत

बदलत्या वातावरणाचा (Climate Change) शेती पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. या बदलत्या वातावरणामुळं रब्बी पीकं (Rabi Crop) धोक्यात आली आहेत.

Agriculture News : राज्यात सातत्यानं तापमानात (Temperature) चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं (Rain) देखील हजेरी लावली आहे. या बदलत्या वातावरणाचा (Climate Change) शेती पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. या बदलत्या वातावरणामुळं रब्बी पीकं (Rabi Crop) धोक्यात आली आहेत. कापूस, तूर, हरभरा तसेच भाजीपाला पिक्काचं 20 ते 25 टक्के नुकसान होण्याची वर्तवण्यात आली आहे.

उत्पादनात घट येणार

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले आहे. दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्र देखील गारठला आहे. तिथेही तापमानाचा पारा घसरला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काह ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे. अशा बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी मात्र चिंतेत आहेत. कारण याचा पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. बदलत्या वातावरणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं उत्पादनात घट येणार आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

किडींसोबत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

बदलत्या वातावरणामुळं पिकांवर किडींसोबतच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. किडींचा प्रादुर्भाव आणि धुक्यामुळं तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या तर हरभऱ्यावर घाटेअळीचा तसेच गव्हावर तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर तूर आणि हरभऱ्याचा फुलोरा गळतो. गव्हाची पाने पिवळी पडतात. मोसंबीचा अंबिया बहार गळत आहे. तसेच आंब्याच्या बहारावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच आंब्याच्या झाडांना लागलेला मोहर या ढगाळ वातावरणामुळं कमी होत आहे. त्यामुळं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत 

कोकणात उशिरानं थंडी सुरु झाली. त्यामुळं कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. दरम्यान, सध्याची थंडी किंवा वातावरण पाहता यंदा हापूसचा मोसम उशिरा असणार आहे. कारण वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि लांबलेल्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंब्याचा हंगाम लांबल्यास मिळणाऱ्या दराबाबत देखील शेतकरी चिंतेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : कोकणात थंडी उशीरा सुरु, आंब्यासह काजू उत्पादक चिंतेत; यंदा हापूस उशिरा मिळणार

महत्त्वाच्या बातम्या

पाणी वाटप सुरु झालं, मात्र आमच्यापर्यंत आलं नाही, सीना माढा योजनेचं पाणी द्या, अन्यथा जलसमाधी घेणार, ग्रामस्थांचा सरकारला इशारा
पाणी वाटप सुरु झालं, मात्र आमच्यापर्यंत आलं नाही, सीना माढा योजनेचं पाणी द्या, अन्यथा जलसमाधी घेणार, ग्रामस्थांचा सरकारला इशारा
साखर कारखान्यांना टनामागे 750 रुपयांचं अनुदान द्यावं, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी, म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार 
साखर कारखान्यांना टनामागे 750 रुपयांचं अनुदान द्यावं, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी, म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार 
Chandrashekhar Bawankule:'शेतकऱ्याच्या मागं तगादा लावायचा नाही' चंद्रशेखर बावनकुळेंची बँक अधिकाऱ्यांना सूचना; दुष्काळी पंचनामे अन सरसकट मदतीवर म्हणाले...
'शेतकऱ्याच्या मागं तगादा लावायचा नाही' चंद्रशेखर बावनकुळेंची बँक अधिकाऱ्यांना सूचना; दुष्काळी पंचनामे अन सरसकट मदतीवर म्हणाले...
Dharashiv News: घरातील सोनं विकून शेती केली, पदरी निराशा; 35 वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवलं; संतप्त नातेवाईकांनी बॉडी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणली; धाराशिवमधील घटना
घरातील सोनं विकून शेती केली, पदरी निराशा; 35 वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवलं; संतप्त नातेवाईकांनी बॉडी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणली; धाराशिवमधील घटना

व्हिडीओ

Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी
Satej Patil On Mahadev Jankar : महादेव जानकरांना 200 कोटींची ऑफर, कुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न;सतेज पाटलांचा गंभीर आरोप
CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse: मुक्ताईनगर येथील ‘खडसे फार्महाऊस’वर अज्ञाताकडून ड्रोनद्वारे रेकी; उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाईची आमदार एकनाथराव खडसेंची मागणी
‘खडसे फार्महाऊस’वर अज्ञाताकडून ड्रोनद्वारे रेकी; एकनाथ खडसेंकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Election Commission Row : 'ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, निवडणूक आयोगाच्या कारभारावरून पी. चिदंबरम आक्रमक
'ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, निवडणूक आयोगाच्या कारभारावरून पी. चिदंबरम आक्रमक
Border Infiltration : 'पुन्हा घुसखोरी केली तर...'; परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजदूताला सुनावले, फिरोजपूर घटनेवर कडक इशारा
'पुन्हा घुसखोरी केली तर...'; परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजदूताला सुनावले, फिरोजपूर घटनेवर कडक इशारा
IND vs WI : वेस्ट इंडिजनं शेवट गोड केला, तिसऱ्या वनडेत भारतावर दणदणीत विजय, कर्णधार शाई होपची नाबाद शतकी खेळी
वेस्ट इंडिजनं शेवट गोड केला, तिसऱ्या वनडेत भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियाचं काय चुकलं?
‘कोण होणार करोडपती’चा ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच माधुरींच्या चाहत्याचा जल्लोष, ब्लेझर काढून केला डान्स!
‘कोण होणार करोडपती’चा ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच माधुरींच्या चाहत्याचा जल्लोष, ब्लेझर काढून केला डान्स!
Punjab News : पंजाबच्या अमृतसरमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मॅडी संधूला संपवलं,भरदिवसा धडाधड गोळीबार
पंजाबच्या अमृतसरमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मॅडी संधूला संपवलं,भरदिवसा धडाधड गोळीबार
Satara News : वीजपुरवठा खंडित झाला, बिबट्याचा घराबाहेर खेळणाऱ्या लहान बाळावर हल्ला, साताऱ्यातील न्हाळेवाडी ग्रामस्थांनी पाठलाग केला पण तोपर्यंत सगळं संपलेलं... 
वीजपुरवठा खंडित झाला, बिबट्याचा घराबाहेर खेळणाऱ्या लहान बाळावर हल्ला आणि खंडागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper Train: मुंबई- बंगळूर वंदे भारत स्लीपर ट्रेन व्हाया सोलापूर धावणार; एकूण किती थांबे आणि आठवड्यातून किती दिवस धावणार?
मुंबई- बंगळूर वंदे भारत स्लीपर ट्रेन व्हाया सोलापूर धावणार; एकूण किती थांबे आणि आठवड्यातून किती दिवस धावणार?
Embed widget