Fakhar Zaman Injury Update : टीम इंडियाचा सर्वांत मोठा अडथळा दूर?, अख्ख्या पाकिस्तानला ज्याचा गर्व तोच खेळाडू जखमी; IND vs PAK सामन्यातून बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये खेळला जात आहे.

Fakhar Zaman Injury Update : अखेर प्रतीक्षा संपली... 29 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर कोणत्या तरी आयसीसी कार्यक्रमात पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजले. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये खेळला जात आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील संघ न्यूझीलंडशी भिडत आहे. पण सामना सुरू होताच 440 व्होल्टचा झटका बसला.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने चांगली सुरुवात केली. दुसरीकडे, पहिल्या सामन्याच्या पहिल्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का बसला, संघाचा सलामीवीर फलंदाज फखर झमान क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला.
सामन्यातील पहिले षटक शाहीन शाह आफ्रिदीने टाकले, या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विल यंगने मिड-ऑफच्या दिशेने एक शॉट खेळला. हलक्या हातांनी खेळलेल्या या शॉटमध्ये ताकद जरा जास्त होती. गॅपमध्ये जाणारा चेंडू हळूहळू सीमारेषेकडे जात होता, त्यामागे फखर झमान धावत असताना पडला. आणि त्यांच्या स्नायू दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जाण्याची वेळ आली.
Fakhar Zaman Injury #iccchampionstrophy2025 pic.twitter.com/OUMQjknTr2
— yogendracrick (@cricketlover672) February 19, 2025
फखर झमानच्या दुखापतीबद्दल अपडेट
फखर झमानच्या दुखापतीबाबत पीसीबीने अधिकृत निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, "फखर जमानला स्नायूंमध्ये ताण आला आहे. त्यांची तपासणी केली जात आहे आणि योग्य वेळी अधिक माहिती दिली जाईल." न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी तो येऊ शकतो, पण भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात त्याच्या खेळण्यावर शंका आहे. फखर झमान उत्तम फॉर्ममध्ये आहे, त्याच्या दुखापतीमुळे पाक कर्णधार रिझवानच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहे.
टीम इंडियाचा सर्वांत मोठा अडथळा दूर? पाकिस्तानच्या वाढल्या अडचणी
पाकिस्तानचा दुसरा सामना 23 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध आहे. या सामन्यात फखर झमानच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे, जर झमान बाहेर पडला तर तो पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल. झमानच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 85 सामन्यांमध्ये 3627 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. 23 फेब्रुवारी रोजी होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचा दुसरा सामना असेल. भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून (IND vs BAN) चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात करणार आहे.
हे ही वाचा -





















