एक्स्प्लोर
Donald Trump : मित्र म्हणत म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला गुलिगत धोका? एका निर्णयानं भारताला दरवर्षी 58000 कोटींचं नुकसान होणार
US tariff Impact on India: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वलक्षी प्रभावानं आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय. याचा फटका भारतासह विविध देशांना बसू शकतो.

डोनाल्ड ट्रम्प
1/6

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं भारताची चिंता वाढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या चांगल्या संबंधाची चर्चा झाली. मात्र, ट्रम्प टॅरिफच्या धमकीसह भारतासह अनेक देशांना धमकावत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रभावानं आयात शुल्क लागू करण्याची धमकी दिली आहे.
2/6

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीनं भारताच्या निर्यातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय लागू केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी 7 अब्ज डॉलर्स म्हणजेच 58000 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं.
3/6

सिटी ग्रुपच्या रिपोर्टनुसार ट्रम्प सरकारच्या यानिर्णयामळं भारताला दरवर्षी 58 हजार कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. भारत सरकार ट्रम्प यांच्या नव्या कराच्या रचनेला समजून घेण्यासाठी आणि याचा फटका बसण्यापासून वाचण्यासाठी अमेरिकेसोत एक नवा व्यापार करार करण्याची तयारी करतंय.
4/6

टॅरिफमुळं सर्वाधिक केमिकल्स, धातू उत्पादनं, दागिने ही क्षेत्र प्रभावित होतील. याशिवाय ऑटोमोबाइल, फार्मास्युटिकल्स आणि अन्न उत्पादनांवर प्रभाव पडेल. वस्त्रोद्योग, लेदर आणि लाकडी उत्पादनं देखील प्रभावित होऊ शकतात.
5/6

फायनान्शिअल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार भारतानं 2024 मध्ये पर्ल्स, जेम्स आणि ज्वेलरीची निर्यात अमेरिकेत केली होती. त्याचं मूल्य 8.5 अब्ज डॉलर्स इतकं होतं. दुसऱ्या क्रमांकावर फ्रास्युटिकल्स होतं, त्याची 8 अब्ज डॉलर्सची निर्यात अमेरिकेला केली होती. पेट्रोकेमिकल्स ची 4 अब्ज डॉलर्सची निर्यात केलीय. भारताचं व्यापार आयात शुल्क 11 टक्के आहे जे अमेरिकेच्या दरापेक्षा 2.8 टक्के अधिक आहे.
6/6

अमेरिकेला भारताकडून 42 अब्ज डॉलर्सची निर्यात केली जाते. मात्र, यावर भारतात त्यावर अधिक टॅरिफ लावलं जातं. लाकूड आणि मशिनरीवर 7 टक्के टॅरिफ, शूज आणि ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट 15-20 टक्के टॅरिफ, खाद्यपदार्थांवर 68 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादलेलं असतं. खाद्य पदार्थांवर अमेरिकेचा सरासरी टॅरिफ 5 टक्के तर भारताचा 39 टक्के आहे. भारत अमेरिकेत बनवलेल्या दुचाकींवर 100 टॅरिफ लादतो तर अमेरिका भारतीय दुचाकींवर 2.4 टक्के टॅरिफ आकारतो.
Published at : 19 Feb 2025 01:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion