Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केला मोठा थाट, स्टेडियम मात्र रिकामेच, पाकिस्तानमुळे ICC ला होणार कोट्यवधींचं नुकसान? Photo Viral
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू झाली आहे. 29 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसी स्पर्धा आयोजित केली जात आहे.

Pakistan Empty Stands In Karachi Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू झाली आहे. 29 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसी स्पर्धा आयोजित केली जात आहे, तेव्हा किमान पहिल्या सामन्यात प्रेक्षकांची मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती, परंतु असे दिसले नाही. पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्याच खेळाडूंकडे पाठ फिरवली आहे. हो, कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामुळे आयसीसीला मोठा धक्का बसला आहे.
कराची स्टेडियममधून समोर आलेले फोटो पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे. आयसीसीला अपेक्षा होती की सुरुवातीच्या सामन्यात संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरेल, परंतु कराचीमध्ये शांतता आहे. जवळजवळ अर्ध्या स्टेडियममध्ये फक्त खुर्च्या दिसतात, पण चाहते गायब आहेत.
Empty Stadium!#Pakistan has lost its joy? We no longer have reasons to celebrate or enjoy life?
— Faisal Ashfaq (@faisal_qafhsa) February 19, 2025
Our rulers impose obedience via violence instead of fostering happiness, leaving us a sick nation. Painful to see us miss the joy that events like the#ChampionsTrophy should bring. pic.twitter.com/0y1rfsdlDk
चॅम्पियन्स ट्रॉफी रिकाम्या स्टेडियममध्ये सुरू
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी रिकाम्या स्टेडियममध्ये सुरू होत आहे. पाकिस्तानचा सामना सुरू असताना ही परिस्थिती आहे. तेव्हा प्रेक्षक इतर संघांचे सामने पाहण्यासाठी कशावरून स्टेडियममध्ये येतील, असा प्रश्न आता पडला आहे. तिकिटाची किंमत जास्त आहे असे नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच तिकिटांच्या किमतीत मोठी कपात केली होती, परंतु तरीही पाकिस्तानी चाहते सुरुवातीचा सामना पाहण्यासाठी आले नाहीत.
WPL pulling more crowd than this empty stadium for inaugural match
— Santoshvk18 (@VK18foreverrr) February 19, 2025
It’s dumbest decision by @ICC to give Pakistan hosting opportunity #ChampionsTrophy #PakistanCricket #PAKvNZ pic.twitter.com/iLO2XQR8xg
आयसीसीला मोठे नुकसान होणार?
आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जात आहे. यजमान पाकिस्तानला आयसीसीकडूनही खूप मदत मिळाली आहे. पण, पहिल्या सामन्यातच सर्व उत्साह थंडावला आहे. 35 हजार क्षमता असलेल्या कराची स्टेडियममध्ये फक्त 15 हजार प्रेक्षक पोहोचले आहेत. येत्या सामन्यांमध्येही हीच परिस्थिती राहिली तर आयसीसीला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
कराचीमध्ये सुरू असलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली पण त्यांनी 100 धावांच्या आत त्यांच्या 3 मोठ्या विकेट गमावल्या. स्टार फलंदाज केन विल्यमसनला नसीम शाहने फक्त एक धाव काढल्यानंतर बाद केले. सलामीवीर विल यंगने डाव सावरला आणि न्यूझीलंडला परत आणले. हे वृत्त लिहिताना, न्यूझीलंडने 3 विकेट गमावून 150 धावा केल्या आहेत. यंग शतकाच्या जवळ आहे, तर टॉम लॅथम त्याला 36 धावांसह साथ देत आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
