एबीपी नेटवर्कच्या Idias Of India Summit 2025 चे 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी आयोजन, दिग्गजांसोबत होणार देशाच्या जडणघडणीवर चर्चा!
Ideas of India Summit 2025 : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एबीपी नेटवर्कने Ideas of India Summit चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात दिग्गज चेहरे वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडतील.

ABP Network Ideas of India Summit 2025 : दरवर्षी एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'ची सगळीकडे चर्चा असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एबीपी नेटवर्कने आयडियाज ऑफ इंडिया समिट 2025 चे आयोजने केले आहे. या कार्यक्रमात एबीपी नेटवर्कच्या मंचावर वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज, बुद्धीजिवी एकत्र येणार आहेत. आयडियाज ऑफ इंडिया समिटचे हे चौथे वर्ष आहे. ‘ह्युमॅनिटीज नेक्स्ट फ्रंटियर' हा यावेळच्या समिटचा विषय असेल. हा कार्यक्रम 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होणार आहे.
दोन दिवसीय कार्यक्रमात होणार सखोल चर्चा
मानवी ज्ञान आणि नाविन्यता यांच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत. अशा जागतिक परिस्थितीत भारताची भूमिका यावर या दोन दिवसीय कार्यक्रमात सखोल चर्चा होईल. त्यासाठी आघाडीचे बुद्धीजीवी एकत्र येऊन या परिषदेत भारत कृत्रीम बुद्धीमत्ता, जागतिक अर्थव्यवस्था, संस्कृती, विज्ञान तसेच अन्य क्षेत्रांत आपले योगदान देण्यासाठी मनुष्यबळाचा तसेच सामाजिक-आर्थिक शक्तीचा कसा करू शकतो, यावरही सांगोपांग चर्चा करतील. या समिटच्या माध्यमातून भारताला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एक रोडमॅपही तयार करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
गौर गोपाल दास उपस्थित राहणार
एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया 2025 या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज, बुद्धीजिवी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मोटीव्हेशनल स्पिकर आणि लाईफस्टाईल कोच असलेले गौर गोपाल दास हे 21 व्या शतकात अध्यात्माचा विकास आणि उत्क्रांती यावर आपले मत मांडतील. तर लेखक, पत्रकार आणि ट्रॅव्हलर पिको अय्यर यांच्यासारखे दिग्गज प्रवास आणि साहित्यिक इतिहासाबद्दल सांगतील.
कार्यक्रमात कोणकोणते मान्यवर उपस्थित राहणार?
या कार्यक्रमास उस्ताद तौफिक कुरेशी आणि तबलावादक बिक्रम घोष हेदेखील उपस्थित असतील. यासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील डॉ. (प्रा.) वेंकी रामकृष्णन, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ डॉ. प्रतिमा मूर्ती, निमहंसच्या संचालिका डॉ. गौतम चट्टोपाध्याय, वरिष्ठ शास्त्रज्ञ नासा-जेपीएल आणि व्हिजिटिंग प्रोफेसर, कॅलटेक, डॉ. मनीष गुप्ता तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आगामी शक्यतांवर चर्चा करतील.
'हे' दिग्गजही करणार चर्चा
या समिटमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर, बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद, टेनिसपटू लिएन्डर पेस, मास्टर शेफ ऑफ इंडियाचे जज रणवीर ब्रार, किर्लोस्कर सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एमडी गीतांजली किर्लोस्कर, राजकारणी, लेखक शशी थरूर, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले खान सर, अभिनेत्री कृती खरबंदा, अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते अमोल पालेकर, राजकारणी सचिन पायलट, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अभिनेत्री निकिता दत्ता, एमएमए मॅट्रिक्स फिटनेस सेंटरच्या प्रमुख कृष्णा श्रॉफ आदी प्रसिद्ध चेहरेही या समिटला उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम कधी असणार, कुठे लाईव्ह पाहता येईल?
या दोन दिवसांच्या समिटमध्ये एकूण 30 सेशन्स असतील. या 30 सेशन्समध्ये एकूण 50 वक्ते आपले बहुमोलाचे विचार मांडतील. या समिटचे लाईव्ह स्ट्रिमिंग 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.45 वाजता एबीपी नेटवर्कच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर दाखवले जाईल. या समिटचे प्रक्षेपण www.abplive.com वर दाखवले जाईल. या समिटविषयी अधिक माहिती हवी असेल तर https://www.abpideasofindia.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
