धक्कादायक! पुण्यात दुचाकी चालकाचा पोलिसावर हल्ला, डोक्यात घातला दगड, आरोपी फरार
पुण्यात पुन्हा एकदा पोलिसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्यानं वाहतूक पोलिसांवरच (Traffic police) प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात (Pune) पुन्हा एकदा पोलिसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्यानं वाहतूक पोलिसांवरच (Traffic police) प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. राजेश गणपत नाईक (Rajesh Naik) (वय 47) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. फुरसुंगीतील भेकराईनगर (Bhekarainagar) चौकात हा प्रकार घडला आहे.
राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले होते. याचा राग आल्याने दुचाकीचालकाने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गेल्या महिन्यातच पुण्यात तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर केला होता हल्ला
पुण्यातील मगरपट्टा परिसरात गेल्या महिन्यात म्हणजे 11 जानेवारीला एका युवकानं भररस्त्यात पोलिसाला मारहाण केली होती. या युवकानं प्रचंड नशा केली होती. दरम्यान, स्थानिकांनी या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा नशेत होता. हा युवक मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला तो मारहाण करत होता. तसेच रस्त्यावरुन जात असलेल्या अनेकांना तो दगड सुद्धा फेकून मारत होता. दरम्यान, या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हटकले होते. यावेळी राग अनावर झाल्यानं त्या तरुणाने थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. यानंतर जमावाने या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. हडपसर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी सायंकाळी मंगरपट्टा परिसरातील रासकर चौकात कर्तव्यावर होते. यावेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करत होते. त्यावेळी एक जण तिथे थांबलेल्या नागरिकांला दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी इथं कर्तव्यावर असलेल्या वाहतून पोलिसाने त्याला हटकले. याचा राग आल्यानं त्या तरुणाने वाहतून पोलिसालाच मारङाम केल्याचा प्रकार घडला.
दरम्यान, या घटनेनंतर पुण्यात पोलिसच असुरक्षीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण, वारंवार पुण्यात पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. या घटनामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. दरम्यान, अशा हल्लेखोरावंर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























