एक्स्प्लोर

"चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय"

Swara Bhasker on Chhaava : "चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय", असं अभिनेत्री स्वरा भास्करने म्हटलंय.

Swara Bhasker on Chhaava : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या छावा (Chhaava) या सिनेमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रम आणि त्यांचा मुघलांकडून झालेल्या अनन्वित छळ या सिनेमातून दाखवण्यात आलाय. दरम्यान, रिलिज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सिनेमाने 100 कोटींची कमाई देखील केली आहे. अनेकांनी (Chhaava) या सिनेमाचं कौतुक केलंय. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने या सिनेमाबाबत ट्वीटरवरुन भाष्य केलंय. 

स्वरा भास्करने ट्वीटमध्ये काय काय म्हटलंय? 

स्वरा भास्कर या तिच्या ट्विटमध्ये म्हणते, चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झालेत. पण ते सोडून चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील किंवा संताप व्यक्त करत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय. गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले. त्यांचे मृतदेह बुलडोझरद्वारे काढावे लागले. यावर चिंता न व्यक्त करता समाज  500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत आहे, संताप व्यक्त करत आहे, असं स्वरा भास्करने म्हटलंय. 

छावाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद 

छावा हा सिनेमा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलाय तर दिनेश विजन हे या सिनेमाचे निर्माते आहेत. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमाला संपूर्ण भारतातून तुफान प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका निभावली आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. हा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

इतर महत्त्वाच्या बातम्या

किल्ले रायगडावर छत्रपतींच्या छाव्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड, विकी कौशलच्या फॅन्सला आवरताना कसरत, पहा PHOTOS

पुण्यात शिवजयंती अशीही साजरी; 'छावा' सिनेमा मोफत, पारंपारिक पेहरावात प्रेक्षक वाजत गाजत सिनेमागृहात

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 2 First Poster Released: 'देऊळ बंद 2'मध्ये स्वामींचा सर्वसामान्य महिलेच्या दुचाकीवरुन प्रवास; 'देऊळ बंद 2'च्या पहिल्या पोस्टरनं उत्सुकता वाढवली
'देऊळ बंद 2'मध्ये स्वामींचा सर्वसामान्य महिलेच्या दुचाकीवरुन प्रवास; 'देऊळ बंद 2'च्या पहिल्या पोस्टरनं उत्सुकता वाढवली
Pooja Sawant On Women Safety: '...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज, ॲनिमल क्रुएल्टीबाबत म्हणाली...
'...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मुंबई हादरवणाऱ्या स्फोटांनंतरचं गूढ पुन्हा जिवंत; ‘मिशन मुंबई’तून उलगडणार थरार, कधी होणार रिलीज?
मुंबई हादरवणाऱ्या स्फोटांनंतरचं गूढ पुन्हा जिवंत; ‘मिशन मुंबई’तून उलगडणार थरार, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget