Santosh Bangar on Uddhav Thackeray : 2-3 दिवसात ठाकरेंच्या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होईल
Santosh Bangar on Uddhav Thackeray : 2-3 दिवसात ठाकरेंच्या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होईल
कालच सन्माननीय या महाराष्ट्राचे आमचे नेते एकनाथ भाई शिंदे यांचा दौरा नांदेड या ठिकाणी झालाय कालच तीन खासदार येणार होते पण मला वाटते की त्याला काही कारणास्तव कमी जास्त झाला असेल. एक दोन चार दिवसांमध्ये ते येतील अजून कोण कोण येऊ शकत कधी आणि मुहूर्त कधी काढल कु सांगल्याच्यानंतर पुन्हा तुम्ही असं चुकीच आहे ना त्याच्यामुळे थोडसं काहीतरी गुपीट ठेवण लागते आणि ज्या दिवशी तुम्हालाही थोडीशी दाखवायला मजा येईल त्या पद्धतीने बघू तर आपल्या सोबत होते संतोष भांगार ज्यांनी म्हटलेल आहे की अगदी थोड्याच दिवसांमध्ये ठाकरेंचे खासदार हे शिंदें सोबत आलेले दिसतील
हे ही वाचा...
वसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल् या होत्या. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सर्व खासदारांसह राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. अरविंद सावंत म्हणाले, ज्यांचं सरकारमध्ये त्रांगडं सुरु आहे, वाद सुरु आहेत, गंभीर वाद सुरु आहेत. या सगळ्याकडून दृष्टी दुसरीकडे वळवावी असा प्रयत्न केला जातो. त्यानुसार जाणीवपूर्वक सकाळी 7 वाजल्यापासून बातम्या कोणीतरी सोडण्यात आल्या आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले.
आपण सर्व जाणता सकाळपासून अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेय, एकमत नाही, सुसंवाद नाही, विंसवाद सुरु आहे. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना ते डायवर्ट करायचं यासाठी कुणीतरी पुडी सोडली आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.






















