लाडकी बहीण योजनेला शासनाचं आणखी बळ मिळणार; नवसंकल्पनेतून महिलांना कुठला लाभ मिळणार?
नागपूरमधील लाडकी बहीण योजनेतील महिलांनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली असून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उद्योगाच्या रुपाने नवं पाऊल टाकलं आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये गमेचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki bahin yojana) निवडणुकांच्या निकालानंतरही तितकीच चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी महायुतीमधील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचा फुल्ल प्रचार व प्रसार केला. अर्थात, या योजनेचा फायदा जसा महिलांना झाला तसाच राजकीय पक्षांना निवडणुकांमध्ये झाला. भाजप महायुतीला (Mahayuti) तब्बल 237 जागांवर बहुमत मिळाले असून एकहाती सत्ता स्थापन करण्यात यश आलं आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेचं हे फलित असल्याचं सर्वच नेत्यांनी देखील मान्य केलं आहे. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींची स्क्रुटीनी होऊन लाभार्थ्यांना वगळण्यात येत आहे. त्यामुळे, लाडकी बहीण काहीही नाराज असतानाच आता, लाडकी बहीण योजनेतील महिलांना राज्य सरकार आणखी बळ देणार असल्याची माहिती आहे.
नागपूरमधील लाडकी बहीण योजनेतील महिलांनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली असून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उद्योगाच्या रुपाने नवं पाऊल टाकलं आहे. आता, नागपूरमधील लाडक्या बहिणींच्या या संकल्पनेच्या स्वरुपात राज्यभरातील महिलांना राज्य सरकार मदतीचा हात देणार असल्याची माहिती आहे. नागपूर मधील लाडक्या बहीण योजनेतील 3 हजार महिलांनी एकत्र येऊन 30 लाखांचा केला निधी उभा आहे. प्रत्येक महिलेने 1 हजार रुपये जमा करत 30 लाखांचा निधी जमा करत क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी स्थापन केली आहे. या निधीतून महिलांना उद्योगाला हातभार लावला जाणार आहे. त्यामुळे, याप्रमाणे इतर महिलांनी देखील प्रयोग करुन इतर उद्योगधंदे सुरु करण्यासाठी राज्य सरकार मदत करणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी, राज्य शासनाच्या आर्थिक विकास महामंडळामार्फत महिलांना मदत केली जाणार आहे.
नागपूरमधील लाडक्या बहिणीचं हे उदाहरण समोर ठेवून इतर महिलांना मदत करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे, आधीच लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देऊन आर्थिक लाभ देणाऱ्या सरकारने ही संकल्पना सत्यात उतरवल्यास या महिलांना उद्योग विकासात आणखी मदत होईल. दरम्यान, सरकारकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. कारण, यापूर्वी महायुतीने निवडणूकपूर्व जाहीरनाम्यात तशी घोषणाही केली होती. त्यामुळे, लाडक्या बहिणी सध्या 2100 रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत.
5 लाख लाभार्थी महिला कमी
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं गेल्या काही दिवसांपासून योजनेतील अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरु केली होती. डिसेंबरमध्ये राज्य सरकारनं 2 कोटी 46 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वाटप केले होते. तर, जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 2 कोटी 41 लाख महिलांना दिला गेला होता. या योजनेतील 5 लाख लाभार्थी महिला त्या महिन्यात कमी झाल्या. त्यामध्ये काही लाभार्थी महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या होत्या हे समोर आलं होतं. याशिवाय काही महिलांचं वय 65 वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांची संख्या कमी झाली. याशिवाय अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या किंवा चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिला अर्जदारांची नावं कमी करण्यात आली होती.
हेही वाचा
शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'; शिंदेंच्या आमदाराचं CM फडणवीसांना पत्र
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

