एक्स्प्लोर
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच मिळणार 2000 रुपये, उरले फक्त काहीच दिवस
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
PM Kisan Yojana
1/10

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यत जमा झाले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
2/10

केंद्र सरकार फेब्रुवारीच्या अखेरीस पीम किसानचा 19 वा हप्ता जारी करणार आहे.
3/10

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि इतर विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळीच ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरित करणार आहेत
4/10

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी, ई-केवायसी असणे आवश्यक आहे.
5/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 18 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर येत्या 24 तारखेला PM किसानचा 19 हप्ता जारी करण्यात येणार आहे.
6/10

पीएम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे. ज्याला भारत सरकार 100 टक्के वित्तपुरवठा करते. या अंतर्गत, हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
7/10

योजनेंतर्गत, जमीनधारक शेतकरी कुटुंबाच्या (ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे) आधार लिंक बँक खात्यात दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये वार्षिक पेमेंट केले जाते.
8/10

eKYC करणे आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय पोहोचेल. त्यामुळं फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.
9/10

योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड, नागरिकत्व प्रमाणपत्र, जमिनीची मालकी दर्शवणारी कागदपत्रे, बँक खाते तपशीलांसह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
10/10

eKYC करणे आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय पोहोचेल.
Published at : 06 Feb 2025 09:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























