ABP Majha Headlines : 3 PM : Maharashtra News : 07 Feb 2025 : ABP Majha
महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख, मग मतदार ९ कोटी ७० लाख कसे, राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल...अंतिम मतदारयादी देण्याची केली मागणी...
दिल्लीत काँग्रेसचा पराभव होणार असल्यानं बचावासाठी राहुल गांधींचा मतदानाच्या आकड्यांवरून आरोप, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल...पराभवाच्या भाषणाची प्रॅक्टिस करत असल्याचा टोला...
ठाकरेंचे अनेक माजी आमदार आणि खासदार संपर्कात, टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार, उदय सामंत आणि शिरसाटांचा दावा...तर, शिंदे गट भाजपच्या पोटातलं अपेंडिक्स, कधीही काढलं जाऊ शकतं, संजय राऊतांचा पलटवार...
आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, ठाकरेंच्या सर्व ९ खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवली एकी...बीडमधील घटनांवरून लक्ष हटवण्यसाठी खोटे दावे, अरविंद सावंतांचा हल्लाबोल...
जानेवारीपर्यंतच्या छाननीत लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या पाच लाखांनी घटली, मार्चपर्यंत लाभार्थ्यांमध्ये आणखी घट होण्याचा अंदाज
आका वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, सुरेश धस यांची दणकावून मागणी..अशोक मोहितेला मारहाण करणारे वाल्मिकच्याच गँगचे असे आरोप..






















