Indian Flag Flying in Karachi : अखेर कराचीत तिरंगा डौलाने फडकला! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने पुन्हा भारतासमोर टेकले गुडघे
Pakistan vs New Zealand : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे.

ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळल्यापासून कोणत्याना कोणत्या कारणांमुळे वाद होत आहे. अलीकडेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय ध्वज नसल्यामुळे वाद झाला होता. पण आता पाकिस्तानने ही चुक दुरुस्त केले आहे असे दिसते. सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या इतर देशांसोबत भारतीय ध्वज लावलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा राष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय ध्वज दिसत नव्हता, तेव्हा पाकिस्तानवर चाहत्यांनी टीका केली होती.
Indian flag flying high in Karachi 🇮🇳🫡#ChampionsTrophy | #TeamIndia pic.twitter.com/TfmlfaC20f
— Indian Cricket Team (@incricketteam) February 19, 2025
अखेर कराचीत तिरंगा डौलाने फडकला!
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यादरम्यान, एक नवीन फोटो समोर आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या सात देशांचे झेंडे तिथे फडकवले गेले होते, परंतु भारतीय तिरंगा तिथे नव्हता. यावरून बराच वाद झाला. पण आता, कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय तिरंगा फडकताना दिसत आहे.
Indian Flag flying high in Karachi 🇮🇳 pic.twitter.com/Wn4f8gcA21
— Cricket Winner (@cricketwinner_) February 19, 2025
पाकिस्तानसाठी मोठा दिवस
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणे ही पाकिस्तानसाठी एक मोठी संधी आहे. 29 वर्षांनंतर पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे.
Indian flag flying high at Karachi 🇮🇳 pic.twitter.com/crO2CfceUx
— Johns. (@CricCrazyJohns) February 19, 2025
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद आणि हरिस रौफ.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, नॅथन स्मिथ आणि विल ओ'रोर्क.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

