Shiv Sena Operation Tiger: एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' मोडून काढायला पक्षप्रमुख मैदानात; उद्धव ठाकरें 'ती' रणनीती आउटगोइंग रोखणार?
मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. अशातच एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर मोडून काढायला आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून खास रणनीती ही त्यांनी आखली आहे.

मुंबई: मागील काही दिवसांपासून शिंदेंच्या (Eknath Shinde) सेनेच्या ऑपरेशन टायगर (Operation Tiger) ची चर्चा आहे. ठाकरेंच्या सेनेतले माजी आमदार पदाधिकारी ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेसोबत जात आहेत. आता पक्षातले हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि शिंदे सेनेचा ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून विशेष रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. यासाठी पक्षातील नेते, उपनेते,सचिव यांना विशेष जबाबदाऱ्या देऊन पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचा काम केला जाणार आहे. दरम्यान शिवसेनेकडून नेमकी काय रणनीती आखली जातीये हे बघणे ही महत्वाचे ठरणार आहे.
माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश, त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. माजी आमदार सुभाष बने यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. त्यानंतर मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश. पक्षाला नेत्यांसोबत पदाधिकारी जात असल्याचा धक्का बसत असताना आपला जुना शिवसैनिक आपल्या सोबत टिकून राहावा आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धावाधाव सुरू झाली आहे. बैठकांवर बैठकांचा सपाटा यासाठी सुरू आहे. आता हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील नेत्यांवर याची विशेष जबाबदारी टाकली असल्याचं कळतंय....
डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून नेमकी काय पावलं?
-पक्षातील नेते पदावर असलेले त्यासोबत उपनेते पद आणि सचिव पदावर असलेल्या नेत्यांना डॅमेज कंट्रोलसाठी आणि पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी विशेष जबाबदारी देण्यात येतीये
- राज्यातील आपल्या पक्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सेना भवन येथे होईल
-संघटनेमध्ये काही बदल केली जाणार असल्याची माहिती आहे. शिवाय जिथे जुने नेते पदाधिकारी सोडून गेले तिथे नव्या शिवसैनिकाला संधी दिली जाणार आहे.
-शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यभर दौरा करतील, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा म्हणणं असून त्यांची बाजू समजून घेतील. त्याशिवाय नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करतील, असेही सांगण्यात येतंय.
-ठाकरेंच्या शिवसेनेमधील 14 महत्त्वाच्या नेत्यांची दर आठवड्याला बैठक होणार असून यामध्ये सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, अनंत गीते,संजय राऊत, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव,विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब,अरविंद सावंत, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू असतील.
- पक्षातील काही जणं पक्षात राहून पक्षविरोधी काम करत आहेत, हे निदर्शनात येत आहे. त्यांच्यावर पक्षाकडून तातडीने कारवाई केली जाणार
ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या 14 जणांवर नेते पदाची, 43 जणांवर उपनेते पदाची आणि दहा जणांवर सचिव पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आणि राज्यभरात संघटनेतील समन्वय अधिक चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे.
उद्धव ठाकरें 'ती' रणनीती आउटगोइंग रोखणार?
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा शिंदेंकडून ठाकरेंचा एक एक शिवसैनिक सोबत घेतला जात असताना ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागे धक्के देणे अजूनही सुरू आहे. आता हेच धक्के थांबवण्यासाठी ठाकरेंचे शिवसेनेकडून आपल्या अनुभवी नेत्यांची फळी एकत्र करून रणनीती आखली जात आहे. ही रणनीती आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशस्वी होणार का? भविष्यात तयार केली जाणारी रणनीती ठाकरेंचा होणार आउटगोइंग थांबवणार का? हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

