Kalyan Dombivli Buildings: तारीख पे तारीख... डोंबिवलीत 6500 रहिवाशी बेघर होणार? अधिकाऱ्यांच्या चुकांची ए टू झेड स्टोरी
kdmc mahanagarpalika building: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खोटे दस्तऐवज सादर करत रेरामध्ये नोंदणी केल्याने 65 इमारती कारवाईच्या रडारवर आल्या आहेत.

डोंबिवली: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 65 इमारतींवर होणाऱ्या कारवाईने नागरिक हवालदिल झाले असून या बांधकामांना अधिकारी जबाबदार असल्याचा अंदाज एका अनधिकृत बांधकामाने समोर येत आहे. 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधीने अनधिकृत बांधकाम प्रकरणी एका केस स्टडीतून अधिकाऱ्यांची चालढकल आणि अनधिकृत बांधकामांना अभय कसे दिले जाते, हे स्पष्ट झाले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये कशा पद्धतीने अनधिकृत बांधकामे उभी राहतात, याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आले आहे.
एका दाम्पत्याने अनधिकृत बांधकामाच्या पायाभरणीपासून तब्बल दोन वर्षे तक्रार केली मात्र बांधकाम पूर्ण होऊन त्याची विक्री आणि त्या घरांना कर लागू होईपर्यंत अधिकारी तारीख पे तारीख देत राहिले. अधिकाऱ्यांनी पळवाट काढत अनधिकृत बांधकामांना कसे अभय दिले या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 65 अनधिकृत इमारती पाडण्यासाठी कोर्टाने मार्ग मोकळा केला आहे. या अनधिकृत इमारतींना अधिकारी कसे जबाबदार आहेत हे एका केस स्टडीमधून समोर आले आहे
कल्याण चिचपाडा परिसरात अनधिकृत बांधकाम 10 जुलै 2023 ला सुरु करण्यात आले. या बांधकामाची तक्रार मनपाकडे करण्यात आली. या बांधकामाची तक्रार केली तेव्हा बांधकामचे पायाभरणी सुरू होती याचे फोटो काढून अधिकाऱ्यांना तक्रार दिली. तक्रारदार विनोद विष्णु पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे १७/२/२ अंबरनाथ तालुका या जागेमध्ये भारत वालकु म्हात्रे यांनी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले आहे हे बांधकाम तोडण्यात यावे असा तक्रारी अर्ज मनपा आय प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडे केला. अधिकाऱ्यांनी या तक्रारी अर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले
तक्रारदार यांनी पुन्हा १२/०७/२३ ला कल्याण पोलीस आयुक्तांना अनधिकृत बांधकाम होत असल्याचे तक्रारी अर्ज केला. तक्रारदार यांनी अर्जासोबत १२/०७/२३ सद्यस्थितीतील फोटो काढून जोडले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सदर तक्रारी अर्जावर सुनावणी घेण्यास नोटीस बजावली. २८/८/२३ रोजी त्यावर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान अधिकाऱ्यांना महापालिका अधिनियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आणि अर्ज निकाली काढला.
मात्र, अधिकाऱ्यांनी या आदेशाचे उल्लंघन केले आणि पुन्हा अनधिकृत बांधकाम उपायुक्त यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला ३/११/२३ रोजी आदेश देऊन सदर बांधकाम तक्रार वारंवार आमच्या कार्यालयात येत असल्याने कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कारवाई करण्यात यावी असा आदेश दिला. कारवाई करण्यात आली नसल्याने पुन्हा विनोद पाटील यांनी अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडे तक्रार केली. बोरकर यांनी पुन्हा प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला आदेश काढून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
तक्रारींवर तक्रारी येऊनही पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
तक्रारदार यांच्या पत्नी विद्या पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे माहितीच्या अधिकारात संबंधित भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी २०२३/२०२४ रोजी केलेल्या तक्रारीवर कारवाई केलीय तर काय केली अथवा केली नाही, अशी माहिती मागितली जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिली आहे या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अनधिकृत उपायुक्त यांनी प्रसाद बोरकर या विभागाचा पदभार सोडून गेले आणि यांच्या जागी अवधूत तावडे यांनी पदभार स्वीकारला. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी उपायुक्त अवधूत तावडे यांनी पुन्हा २४ मार्च २०२४ ला सुनावणीला बोलवण्याचे आदेश दिले. ही सुनावणी अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी सहाय्यक आयुक्त यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराला बोलवले असल्याने सदर सुनावणी पुढे घेण्यात येईल असे सांगितले.
कारवाईचे आदेश असतानाही सहाय्यक आयुक्त यांनी कारवाई केली नसल्याने तक्रारदार यांनी आयुक्तांच्या जनता दरबारात या प्रकरणी तक्रार केली. या जनता दरबारात आयुक्त इंदूराणी जाखड यांनी अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपायुक्तांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सुनावणी घेण्याचे सांगितले.
१२/६/२०२४ रोजी अनधिकृत बांधकाम उपायुक्त यांनी घेतलेल्या सुनावणी मध्ये आदेश देण्यात आला. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने ग्रामपंचायत परवानगी घेतली आहे मात्र महापालिका परवानगी घेतलेली नसल्याचे नमूद केले.तक्रारदार विद्या पाटील यांनी गुगल फोटो आणि कागदपत्रे सादर केली गुगलवर सर्च केल्यावर सदर जागेवर अनधिकृत चाळी आणि बंगला २०२२ साली बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
घरांना पालिकेकडून अधिकृत टॅक्स पावत्या
सहाय्यक आयुक्त यांनी संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ अन्वेषण महाराष्ट्र अधिनियम १९४९ कारवाई प्रस्तावित करावी. पुन्हा या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पावसाळ्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करता येत नसल्याचे सांगत कारवाई पुढे ढकलली. विद्या पाटील यांनी पुन्हा कारवाई संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागितली सदर जागेवर चाळीचे बांधकाम आणि बंगल्याचे बांधकाम हे अनधिकृत असल्याचे घोषित केले.
१८/१०/२४ ला अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भरत बारकू म्हात्रे,हनुमान महादू म्हात्रे,संजय महादू म्हात्रे यांना सदर जागेवर अनधिकृत अनधिकृत बंगला सदनिका गाळे त्वरित खाली करून घेण्यासाठी नोटीस बजावली. मात्र पुन्हा अधिकाऱ्यांनी या कारवाईला चालढकल करत पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई केली जात नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांनी पोलिसांना पत्र देऊन अनधिकृत बांधकाम निष्काशनासाठी पोलीस बंदोबस्त तूर्त थांबविण्याबाबत १७/१/२५ रोजी दिले असल्याचे जनमाहिती अधिकारी पोलीस उपायुक्त यांनी दिले आहेत.
२०२३ पासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या तक्रारदारांना अधिकाऱ्यांनी नाकीनऊ आणले. धक्कादायक म्हणजे हे अनधिकृत बांधकाम 2022 नंतर झाल्याचे गुगल फोटो वरून सिद्ध झाले आहे. मात्र, २०१५ चे ग्रामपंचायत चिंचपडा यांचे टॅक्स पावती जोडून अधिकाऱ्यांनी बांधकाम झालेले चाळींमधील घरांना टॅक्स लावल्याचे स्पष्ट झाल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी समोर आले आहे.
मनपाने प्रत्यक्ष पाहणी अहवालानुसार सदर भूखंडावर एकूण चार चाळी आहेत चार चाळींमध्ये 42 रुम असून 7 गाळे आहेत त्यापैकी 29 सदनिकांना कर आकारणी झाली आहे. २० सदनिकांना कर आकारणी झाली नाही. हनुमान म्हात्रे,संजय म्हात्रे यांच्या दोन बंगल्यांना अद्याप कर आकारणी केली नाही. तक्रारदार विद्या पाटील आणि विनोद पाटील यांनी बांधकाम सुरू झाल्यापासून तर अनधिकृत चाळी उभ्या राहिल्या त्यांची विक्री झाली त्या घरांवर कर लागला .२०२३ ते २०२५ पर्यत पाठपुरावा केला तरीही अधिकारी या बांधकामांवर कारवाई न तारीख पे तारीख देऊन सुनावणी घेण्यात अडकले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

